बहुजननामा ऑनलाइन – महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट(rashid shaikh) या सामाजिक संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी रशीद शेख(rashid shaikh) यांची नियुक्ती करण्यात आली . या नियुक्तीचे पत्र महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नदीम मुजावर यांच्याहस्ते देण्यात आले .
रशीद शेख हे पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष असून ते माजी नगरसेवक आहेत .या नियुक्तीनंतर रशीद शेख यांनी सांगितले कि , महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट या सामाजिक संघटनेची जबाबदारी माझ्यावर सोपविल्याने आनंद होत आहे . संघटनेच्यावतीने विविध प्रश्नांच्या अडीअडचणी सोडविणार आहे . तसेच , येणाऱ्या काळात महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट या सामाजिक संघटनेच्यावतीने सर्व धर्मीय बांधवांचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करणार आहे .
यावेळी महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट या सामाजिक संघटनेचे सल्लागार कुंदन पुनावाला , शहाजी सावंत , मुस्तफा कपाडिया , विनोद सोळंकी , पुणे शहर अध्यक्ष जफर खान , पुणे जिल्हा अध्यक्ष सुलतान नाझा , शहाबुद्दीन शेख , इरफान शेख , ख्वाजा पठाण , अबू इनामदार , बशिर शेख , नाहिद मुजावर , फिरोज आतार , असिफ कुरेशी , एजाज शेख , स्वीटी पुनावाला व ऍडम मयानी आदी मान्यवर उपस्थित होते .