नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधार कार्ड जारी करणारी संस्था युआयडीएआयने अशा लोकांना दिलासा दिला आहे, ज्यांच्याकडे आवश्यक डॉक्युमेंट्स नसल्याने आधार बनवू शकत नाही. आधारने अशा लोकांना दिलासा देत काढलेल्या सर्क्युलर मध्ये म्हटले आहे की, असे लोक खासदार, आमदार, यांच्या मदतीने आधार कार्ड तयार करू शकतात. अनेक लोक या स्टँडर्ड प्रक्रियेअंतर्गत आवश्यक डॉक्युमेंट्स नसल्याने आधारसाठी अर्ज करू शकत नव्हते. हे लक्षात घेऊन यूआयडीएआयने हे सर्क्युलर जारी केले आहे.
आधार सर्क्युलरमध्ये काय म्हटले आहे
मागील नोव्हेंबरमध्ये यूआयडीएआयने आपल्या सर्क्युलरमध्ये म्हटले होते की, आधारसाठी जरूरी डॉक्युमेंट्स नसल्याने अनेक लोक आधार बनवू शकत नव्हते. अशा लोकांना खासदार, आमदार, गॅझेटेड अधिकारी तहसीलदार, कोणत्याही शिक्षण संस्थेचे प्रमुख, अनाथालयाचे प्रमुख, ग्राम पंचायत सरपंच यांच्याकडून प्रमाणपत्र घ्यावे लागेल. हा निर्णय घेण्यात आला आहे की, स्टँडर्ड सर्टिफिकेटला आधार एन्रॉलमेंटसाठी सर्टिफिकेट मानले जाईल. यासाठी आधार रेग्युलेशनमध्ये बदल करण्यात आला आहे. या सर्टिफिकेटची वैधता केवळ 3 महीन्यांसाठी असेल. कुटुंब प्रमुख, आई-वडीलांच्या आधारच्या मदतीनेही आधार कार्ड तयार करता येते.
या 2 पद्धतीने करा आधारसाठी अर्ज
आधार कार्डसाठी ओळखपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र आणि जन्म प्रमाणपत्राची आवश्यकता असते. परंतु, कुणाकडे यापैकी कोणतेही कागदपत्र नसले तरी आधारसाठी अर्ज करता येईल. यासाठी दोन पर्याय आहे. पहिला पर्याय म्हणजे कुटुंब प्रमुख अथवा अन्य ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने. अनेकदा आवश्यक कागदपत्र नसल्याने अनेक लोक आधार कार्डसाठी अर्ज करू शकत नव्हते. विशेष करून शाळेच्या अॅडमिशनपूर्वी मुलांचे आधार बनविणे जरूरी असते.
5 वर्षांच्या वयाच्या मुलांसाठी
आधार कार्ड 5 वर्षांपेक्षा छोट्या किंवा मोठ्या मुलांचे तयार केले जाऊ शकते. जर तुमचा मुलगा 5 वर्षांपेक्षा छोटा आहे, तर तुम्हाला त्याच्या जन्म दाखल्याची आवश्यकता आहे. जर जन्मदाखला नसेल तर आई-वडीलांच्या आधार कार्डाद्वारे सुद्धा मुलाचे आधार तयार केले जाऊ शकते. 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांची बायोमेट्रिक माहिती घेतली जात नाही. परंतु, जेव्हा त्याचे वय 5 वर्षांपेक्षा जास्त होते तेव्हा बायोमेट्रिक रेकॉर्ड अपडेट करावा लागतो.
Visit : bahujannama.com