बहुजननामा ऑनलाईन- अॅपलने नुकताच 10 सप्टेंबर रोजी आयफोन 11, आयफोन 11 प्रो आणि आयफोन 11 प्रो मॅक्स हे तीन नवीन फोन बाजारात आणले. याशिवाय अॅपलने या कार्यक्रमात लवकरच आयफोन व्यतिरिक्त अनेक उत्पादने सादर करण्याची घोषणा केली आहे. मूळ व्हिडिओ सेवा, अॅपल टीव्ही + आणि गेम सबक्रिफ्शन सेवा सुरू करण्याची कंपनीने तारीख निश्चित केली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाईन व्हिडीओ स्ट्रिमिंग सेवा अॅपल टीव्ही + ची येत्या 1 नोव्हेंबरपासून जगभरात सादर करण्यात येईल. भारतात ही ओटीटी सेवा दरमहा 99 रुपये दराने उपलब्ध होईल. या प्लॅटफॉर्मवर सर्व ओरिजनल व्हिडीओ दाखविण्यात येतील. वापरकर्त्यांना ही सेवा 7 दिवसांसाठी विनामूल्य चाचणी म्हणून वापरण्यासाठी देण्यात येईल. विनामूल्य चाचणीनंतर वापरकर्त्यांचे सब्सक्रिप्शन आपोआप दरमहा 99 रुपये दराने रिन्यु होईल. अॅपल टीव्ही + मध्ये फॅमिली शेअरिंगचे फीचरही देण्यात आले आहे. ज्यामुळे एकाच कुटुंबातील सहा सदस्यांसोबत हे शेअर करता येईल. एक नोव्हेंबरला अॅपल टीव्ही + अॅपवर तीन शो प्रीमियर करण्यात येतील. त्यानंतर दर आठवड्याला एक नवीन भाग प्रदर्शित केला जाईल. अॅपल टीव्ही + वर 40 हून अधिक भाषांमध्ये शो प्रदर्शित करण्यात येणार आहेत.
अॅपल टीव्ही + ला अॅपल टीव्ही अॅपद्वारे अॅक्सेस मिळू शकेल. आयटी, आयपॅड, अॅपल टीव्ही 4 के, अॅपल टीव्ही एचडी, अॅपल टीव्ही (३), आयपॉड टच आणि मॅकवर ही ओटीटी सेवा उपलब्ध करुन दिली जाईल. जे ग्राहक आयफोन, आयपॉड, अॅपल टीव्ही, आयपॉड टच आणि मॅक खरेदी करतील त्यांना ही सेवा एक वर्षासाठी विनामूल्य मिळणार आहे. अॅपलची ही सेवा भारतात सध्या अस्तित्त्वात असलेल्या नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉनशी स्पर्धा करू शकते.