नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय टीमचे सलामी फलंदाज शिखर धवन आणि त्याचा जोडीदार रोहित शर्माला दुखापत झाल्यामुळे भारतीय टीमच्या बाहेर गेला आहे. पुढचे काही महिने दोघे एकसाथ खेळताना दिसणार नाहीत. दरम्यान डावखुऱ्या शिखर धवनने आपला मित्र आणि सलामी जोडीदार रोहित शर्मासाठी एक खास कविता लिहिली असून त्यातून त्या दोघांची मैत्री चांगलीच दिसून येत आहे.
शिखर धवनला कविता ऐकणे, ऐकवणे आणि लिहिण्याची खूप आवड असून या गोष्टीबद्दल कदाचित खूपच कमी लोकांना माहित आहे. धवन सतत आपल्या इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटवर काही व्हिडिओ शेअर करत त्यात तो कविता बोलताना दिसून येत असतो. आता त्याच्या या कलेबद्दल लोकांना कळले असून धवनने ‘गब्बर’ आणि हिटमॅनच्या दोस्तीवर कविता लिहिली आहे.
धवनने आपल्या ट्विटर हँडलवरून एक फोटो शेअर केला असून त्यात धवन आणि रोहित शर्मा हे दोघे दिसून येत आहेत. या फोटोला कॅप्शन देत धवनने “यारी भी की, यारी भी निभाई, खूब सारे रन की पारी भी निभाई…गब्बर और हिटमैन…हैशटैग गब्बर के शब्द!”
https://twitter.com/SDhawan25/status/1232595977896222721
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत शिखर धवनच्या खांद्याला दुखापत झाली असताना त्याचवेळी न्यूझीलंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी -२० मालिकेच्या शेवटच्या सामन्यात रोहित शर्माच्या पायाला दुखापत झाली होती. दोन्ही अनुभवी फलंदाजांनी नॅशनल क्रिकेट एकॅडमी येथे एकत्र खूप वेळ घालवला आणि दुखापतीतून बरे होत आहेत.