बहुजननामा ऑनलाइन टीम – शुक्रवारी सकाळी हैदराबादमध्ये पशुवैद्यकीय डॉक्टरवर सामूहिक बलात्कार केल्याच्या चार आरोपींच्या एन्काऊंटरची बातमी समोर आली. या बातमीने संपूर्ण देशात खळबळ उडाली आणि सर्व बाजूंनी प्रतिसाद मिळाला. भारतीय बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि क्रिकेटपटू हरभजन सिंग यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त करत हैदराबादच्या पोलिसांना सलाम केला.
हैदराबाद येथील महिला पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चार जणांना गुरुवारी रात्री हैदराबाद पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले. जेव्हापासून सामूहिक बलात्काराच्या आरोपींचे एन्काऊंटर झाले तेव्हापासून देशभरात एक वेगळीच प्रतिक्रिया दिसून येत आहे. बहुतेक लोकांनी याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. बबीतासमवेत कुस्तीपटू गीता फोगट, योगेश्वर दत्त यांनीही आपला प्रतिसाद दिला आहे.
सुप्रभात!
आज सुबह-सुबह दिल को सुकून पहुंचाने वाली खबर मिली।हैदराबाद में यह एनकाउंटर हमारे कानून के रक्षकों की समाज के राक्षसों पर शानदार विजय है। पुलिस विभाग को कोटि – कोटि नमन। निर्णय का तरीका चाहे जो रहा हो परंतु इसमें लिया गया समय काबिले-तारीफ है।#Encounter #EncounterNight
— Yogeshwar Dutt (@DuttYogi) December 6, 2019
गुरुवारी रात्री हैदराबाद पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरबद्दल ऑलिम्पिक पदकविजेते सायना नेहवालनेही आनंद व्यक्त केला. भारतीय बॅडमिंटन स्टार सायनाने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली. तिने शुक्रवारी ट्विटरवर लिहिले की, ‘Great work #hyderabadpolice ..we salute’
या एन्काऊंटरवर प्रतिक्रिया देताना महिला कुस्तीपटू बबीता फोगट यांनी ट्विटरवर लिहिले, ‘ठोक दिया ठोक दिया.’ तिची बहीण गीताने लिहले की, ‘हैवानों का एनकाउंटर, WE salute U Hyderabad police’
ठोक दिया ठीक किया #hydrabaadencounter
— Babita Phogat (@BabitaPhogat) December 6, 2019
https://twitter.com/geeta_phogat/status/1202831743952158721
27 नोव्हेंबरला हैदराबादमधील टोल प्लाझा जवळ असलेल्या एका महिलेवर चार जणांनी बलात्कार केला आणि त्यानंतर त्यांची हत्या केली. आरोपींनी प्रथम तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि त्यानंतर तिला जिवंत जाळले.
Visit : bahujannama.com