मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ कारमध्ये आढळलेल्या जिलेटिनच्या कांड्यांच्या प्रकरणात एनआयएने सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची ११ तासानंतर अटक केली़.
वाझे यांची शनिवारी सकाळी १३ वाजल्यापासून पेडर रोड येथील कार्यालयात अखंड चौकशी सुरु होती. त्यात मिळालेल्या माहितीनंतर जवळपास १३ तासांनी त्यांना अटक करण्यात आली.
वाझे यांनी स्फोटके बाळगली, गाडी चोरलेल्यांशी ते संपर्कात होते, तसेच त्यांनी स्फोटके प्रकरणाच्या तपासाकडे दुर्लक्ष केले. त्यांनी स्फोटके बाळगली, कट कारस्थान रचले, असा एनआयएने आरोप केला आहे.
एनआयएच्या अधिकार्यांनी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास सहायक पोलीस आयुक्त नितीन अलकनुरे यांना चौकशीसाठी बोलविले. त्यानंतर तासाभरातच एटीएसचे अधिकारीही एनआयएच्या कार्यालयात पोहचले.
त्यानंतर एनआयए आणि एटीएसच्या अधिकार्यांनी एकत्रितपणे व नंतर स्वतंत्रपणे चौकशी केली.
या चौकशीत वाझे यांनी मनसुख हिरेन यांच्याशी संपर्कात असल्याची कबुली दिली. तसेच १७ फेब्रुवारीच्या रात्री मनसुख हिरेन हे वाझे यांना भेटल्याचा आरोप केला होता. तो वाझे यांनी फेटाळला. हिरेन यांची गाडी आपण वापरली असल्याची वाझे यांनी कबुली दिली.
Mumbi police officer Sachin Waze* has been arrested under Sections 286, 465, 473, 506(2), 120 B of IPC, and 4(a)(b)(I)Explosive Substances Act 1908 for his role & involvement in placing explosives-laden vehicle near Mukesh Ambani's house in Mumbai on February 25: NIA
— ANI (@ANI) March 13, 2021
सचिन वाझे यांना पुढील आरोपाखाली अटक करण्यात आली.
कलम २८६ – स्फोटके सापडल्याप्रकरणी दुर्लक्ष करणे
कलम ४६५ – बनावट / फसवणूक करणे
कलम ५७३ – बनावट शिक्का वगैरे बनविणे किंवा त्याचा ताब्यात ठेवणे़
कलम ५०६ (२), गुन्हेगारी वृत्ती
१२० (ब) गुन्हेगारी कट रचणे
स्फोटक पदार्थ कायदा १९०८ : स्फोटके बाळगणे अथवा बनवणे