बहुजननामा ऑनलाइन – इटलीमधील शास्त्रज्ञांनी कोरोनानंतर शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीज (antibodies) बद्दल मोठी माहिती दिली आहे. शास्त्रज्ञां (Scientist) च्या मते, कोरोना (Corona) मधून बरे झाल्यानंतर आठ महिन्यांपर्यंत रुग्णाच्या रक्तात कोरोनाविरूद्ध एंटीबॉडीज (antibodies) असतात. कोरोना रूग्णांवर निरंतर नजर ठेवणार्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार, जोपर्यंत कोरोनाविरूद्ध एंटीबॉडीज (antibodies) शरीरात राहतात तोपर्यंत विषाणूचा धोका कमी होतो.
antibodies-remain-up-to-8-
मिलानमधील सॅन राफेल रूग्णालया(San Raphael Hospital in Milan)च्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कोरोना रूग्णांमध्ये तयार झालेल्या एंटीबॉडीज रुग्णांचे वय किंवा आजार असूनही रक्तात उपस्थित असतात. अशा परिस्थितीत रुग्णाला कोणत्याही विषाणूमुळे आजारी पडण्याचा धोका खूपच कमी होतो.
इटलीच्या आयएसएस नॅशनल हेल्थ इन्स्टिट्यूट(ISS National Health Institute of Italy)मध्ये काम करणाऱ्या संशोधकांनी या अभ्यासासाठी कोरोना विषाणूची लक्षणे असलेल्या सुमारे १६२ रुग्णांची निवड केली. त्यांचे रक्ताचे नमुने प्रथम मार्च आणि एप्रिलमध्ये घेण्यात आले होते. यानंतर, कोरोनाची लढाई जिंकलेल्या रुग्णांच्या रक्ताचे नमुने नोव्हेंबरमध्ये पुन्हा घेण्यात आले. संशोधकांनी असे म्हटले आहे की कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर पुढील आठ महिन्यांपर्यंत या रुग्णांच्या शरीरात एंटीबॉडीज आढळले.
web title: Antibodies stay in the body for days after the corona, scientists said
पुढील महिन्यापासून जास्त दराने वसूल केला जाईल TDS, ‘या’ व्यक्ती येतील कक्षेत; जाणून घ्या