Anti Corruption Trap | लसीकरणासाठी 400 रुपयाची लाच घेणारा रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

Anti Corruption Demand for bribe of Rs three thousand

चाकण : बहुजननामा ऑनलाईन – Anti Corruption Trap | चाकण ग्रामीण रुग्णालयातील (Chakan Rural Hospital) लसीकरण केंद्रावर (vaccination center) कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याला लसीकरणासाठी 400 रुपयांची लाच (Bribe) घेताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून (Anti Corruption Trap) अटक (Arrest) केली. ही कारवाई गुरुवारी (दि.26) दुपारी दोनच्या सुमारास चाकण ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. सचिन अरुण शिंदे Sachin Arun Shinde (रा.रसे, ता. खेड) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याचे नाव आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

चाकण ग्रामीण रुग्णालयात कोरोनाचे लसीकरण करण्यात येत आहे.
लसीकरण केंद्रावर नागरिकांची मोठ्या प्रमाणत गर्दी होत असते.
गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मागील काही दिवसांपासून कंत्राटी कर्मचारी सचिन शिंदे हा काम करत आहे.
सध्या तो चाकण ग्रामीण रुग्णालयात अधिकृतपणे नेमणुकीस होता का हे अद्याप समजू शकले नाही.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (pune anti corruption bureau) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या प्रवेश द्वारावर सचिन शिंदे याला तक्रारदार यांच्याकडून 400 रुपये घेताना रंगेहाथ पकडले. सचिन शिंदे याच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईनंतर चाकण ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण बंद करण्यात आले.
यानंतर पोलिसांनी इतर काही जणांची चौकशी सुरु केली आहे.

Web Title : chakan crime news bribery for vaccination one was arrested

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Maharashtra Government | ठाकरे सरकारकडून राज्यातील लाखो अधिकार्‍यांना मोठा दिलासा ! मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ 6 महत्वपूर्ण निर्णय

JEE Main-NEET 2021 | नीट आणि जेईई मेनच्या उमेदवारांसाठी मोठी बातमी, यावेळी नियमांमध्ये झाले ‘हे’ बदल, जाणून घ्या