सोलापूर : बहुजननामा ऑनलाइन- Anti Corruption Trap |मुरुम चोरी (Thift) प्रकरणातील आरोपींला सहकार्य करतो, असे सांगून साडेसात लाखांची लाच (Bribe) स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागा (anti corruption bureau ) ने सापळा रचून सलगर वस्ती पोलीस ठाण्या (Salgar Vasti Police Thane) चे सहायक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे (Assistant Inspector of Police Rohan Khandagale) याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत पवार (Senior Police Inspector Sampat Pawar) यालाही अटक (Arrest) करण्यात आली आहे.
Anti Corruption Trap | police inspector and police sub inspector of solapur are in anti corruption trap of seven and half lakh bribe
संपत पवार हा ३२ वर्षांपासून पोलीस दलात कार्यरत आहे. अडीच वर्षांपूर्वी त्याने सलगर वस्ती पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारला होता. येत्या ४ महिन्यात तो सेवानिवृत्त होणार होता. निवृत्तीआधीच तो सापळ्यात अडकला. तक्रारदारावर मुरुम चोरी प्रकरणी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात जप्त केलेली वाहने सोडावीत, तसे गुन्ह्यात मदत व सहकार्य करावे, यासाठी संपत पवार व रोहन खंडागळे यांनी १० लाख रुपयांची मागणी केली होती.
तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याची पडताळणी करताना तडजोडीअंती ती रक्कम साडेसात लाखांवर आली. ही साडेसात लाख रुपये स्वीकारण्यासाठी एपीआय खंडागळे हा पुणे रोडवरील एका ठिकाणी थांबला होता.
मोबाईलवरुन संपत पवारही त्याच्या संर्पकात होता.
जुना पूना नाका परिसरात तक्रारदाराकडून साडेसात लाख रुपये स्वीकारताना खंडागळे याला पकडण्यात आले.
त्याचबरोबर संपत पवार यालाही पकडण्यात आले.
या सापळा कारवाईनंतर रात्री उशिरा दोघांच्या घराची झडती घेण्यास सुरुवात करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत त्यांच्या घराची झडती घेण्याचे काम सुरु होते.
पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कविता मुसळे व त्यांच्या सहकार्यांनी ही कारवाई केली.
पोलीस निरीक्षक संपत पवार यांची या पूर्वी पुण्यातील गुन्हे शाखेत आणि दत्तवाडी पोलीस ठाण्यात नोकरी झाली आहे.
web title: Anti Corruption Trap | 2 officers including a police inspector caught in anti-corruption scam in a bribery case of Rs 7.5 lakh; Excitement in the state police force.