आष्टी : बहुजननामा ऑनलाइन – Anti-Corruption |बीड जिल्ह्यातील (Beed) आष्टी (Ashti) तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक (Police Sub Inspector Rahul Lokhande) राहुल लोखंडे यांना 80 हजाराची लाच(Bribe) घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (Anti-Corruption) रंगेहात पकडले आहे. सदरची कारवाई औरंगाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Aurangabad Anti-Corruption) सोमवारी (26, जुलै) रोजी दुपारी केली आहे.
औरंगाबाद एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, अंभोरा पोलीस स्टेशनचे (Ambhora Police Station) लोकसेवक पोलीस उपनिरीक्षक राहुल पांडूरंग लोखंडे (Police Sub Inspector Rahul Lokhande) (रा.तिरूपती पार्क, पिसादेवी पार्क – A प्लाँट नंबर 02 औरंगाबाद ) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी 20 जुलै रोजी तक्रारदारविरूध्द अंभोरा पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्हयात मंजूर असलेला अटकपूर्व जामीन उच्च न्यायालया(High Court)कडून रद्द न करण्यासाठी आणि गुन्ह्यात असलेल्या गाड्या जप्त न करण्यासाठी 1 लाख रुपयांची मागणी केली होती.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, तडजोडी नंतर 80 हजार रूपये देण्याचं ठरलं. त्यांनतर सोमवारी (26, जुलै) रोजी औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (ACB) कारवाई करत राहुल लोखंडे यांना रंगेहात पकडलं आहे. याबाबत अभोरा पोलीस ठाण्यात (Ambhora Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
web title: Anti-Corruption | Sub-Inspector of Police caught taking Rs 80,000 in anti-corruption scam.
Nashik Crime | दोघा भावांवर सपासप वार करत जीवघेणा हल्ला; नाशिक शहरातील खळबळजनक घटना, Video व्हायरल
Gold Price Today | सोन्याचा दर वाढून 46,753 रुपयांवर पोहचला, चांदीही महागली; जाणून घ्या आजचे दर