पुणे :बहुजननामा ऑनलाइन – Anti Corruption Pune |पुणे महापालिकेच्या (pune corporation) शालेय शिक्षण विभागातील प्रशासकीय अधिकाऱ्या(Administrative officers)स 50 हजार रुपयांची लाच घेताना पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (anti corruption bureau pune) रंगेहात पकडले आहे. ही कारवाई सुरू असून, कारवाईचे कारण मात्र समजू शकलेले नाही. पुणे महापालिकेच्या अधिकार्यास लाच घेताना पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (anti corruption bureau pune) रंगेहाथ पकडल्याने प्रंचड खळबळ उडाली आहे.
सहाय्यक प्रशासकीय शिवाजी मोरमारे (shivaji mormare) असे पकडण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी कारवाई सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी मोरमारे हे शालेय शिक्षण विभागात सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (Assistant Administrative Officer) आहेत. त्यांनी 50 हजाराची लाचेची मागणी केली होती. त्याबाबत एसीबीकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार सापळा कारवाई करण्यात आली आहे. त्यांना नुकतीच 50 हजार रुपयांची लाच घेताना पकडले आहे. यामुळे पालिकेत खळबळ उडाली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काही दिवसांपुर्वीच पुणे महापालिके(Pune Municipal Corporation)च्या मुख्य विधी अधिकार्याला देखील लाच घेताना पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते.
काही दिवसांच्या अंतरावर सलग अॅन्टी करप्शन विभागाने पुणे महापालिकेतील दोन अधिकार्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
मनपाच्या अधिकार्यांची खाबुगिरी मोठया प्रमाणावर सुरू असल्याचे झालेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईवरून स्पष्ट होत आहे.
दरम्यान, शासकीय लोकसेवकाने लाचे(bribe)ची मागणी केल्यास त्याबाबत नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी अन्यथा टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी असे आवाहन पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक राजेश बनसोडे (Rajesh Bansode, superintendent of police) यांनी केले आहे.
Web Titel :- Anti Corruption Pune | Anti-corruption Trap in Pune Municipal Corporation, administrative officer arrested while taking bribe of Rs 50,000