Anti Corruption Pune | पिंपरीनंतर आता पुणे मनपातील बडा अधिकारी अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, प्रचंड खळबळ
पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – पिंपरी-चिंचवड महापालिकेत (Pimpri Chinchwad Corporation) पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Pune) सापळा रचून मोठी कारवाई केल्याच्या घटनेला आठवडा देखील पुर्ण झाला नाही तोवर लाचलुचतप प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (Anti Corruption Pune) पुणे महानगरपालिकेच्या उप अभियंत्याला 50 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहेत. त्यामुळे पुण्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सुधीर सोनवणे Deputy Engineer Sudhir Sonawane (उप अभियंता, रस्ते विभाग, टिंगरेनगर,
पुणे महापालिका) असे अॅन्टी करप्शनच्या सापळयात सापडलेल्या मनपाच्या (Pune Corporation) अधिकार्याचे नाव आहे.
अॅन्टी करप्शन विभागाने काही दिवसांपुर्वी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत (PCMC) सापळा रचून कारवाई केली होती. लाच प्रकरणी थेट स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे (standing committee chairman adv nitin landge) यांच्यासह त्यांच्या पीएला
आणि इतर चौघांना अटक केली होती.
आजच (सोमवार) अॅड. नितीन लांडगे यांचा अंतरिम जामिन मंजूर झाला आहे.
पिंपरी मनपातील लाच प्रकरण ताजे असतानाच पुणे महानगरपालिकेच्या उप अभियंत्याला अॅन्टी करप्शनने 50 हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.
सुधीर सोनवणे हे पुणे मनपाच्या (PMC) रस्ते विभागात कार्यरत होते.
उप अभियंत्याला 50 हजार रूपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
पुणे लाचलुचतप प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (ACB SP Rajesh Bansode), अप्पर अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav), अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा
(Addl SP suhas nadgouda) , उप अधीक्षक श्रीहरी पाटील (DySp Shrihari Patil)
यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे अॅन्टी करप्शनच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास अॅन्टी करप्शनचे अधिकारी करीत आहेत.
Web Title : Anti Corruption Pune | After Pimpri now the big officials of Pune Municipal Corporation are in the trap of anti corruption. pmc Deputy Engineer Sudhir Sonawane arrested by acb pune
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Parambir Singh | सचिन वाझेच्या ‘कोड’चा हॉटेल मालकाने केला उलगडा; ‘नंबर वन’ म्हणजे परमबीर सिंग
Comments are closed.