ठाणे : बहुजननामा ऑनलाइन – जामीन मिळवण्यासाठी तपास अधिकाऱ्याचा (Investigating Officer) से आणून तो कोर्टात जमा करण्यासाठी दीड हजार रुपयाची लाच स्विकारताना (Accepting Bribe) वागळे इस्टेट पोलीस ठाण्यातील (Wagle Estate Police Station) पोलीस नाईक मिलिंद गणेश जोशी Milind Ganesh Joshi (वय-41) याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Thane) सापळा रचून अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि.27) दुपारी दीडच्या सुमारास करण्यात आली. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Thane) केलेल्या या कारवाईमुळे ठाणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
तक्रारदार (वय-52) यांच्या मुलावर वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली आहे. मुलाचा जामीन (Bail) करण्यासाठी तपास अधिकाऱ्याचा से आवश्यक असल्याने तक्रारदार यांनी कोर्ट कारकून (Court clerk) मिलिंद जोशी यांच्याकडे तपास अधिकाऱ्याचा से आणून कोर्टात जमा करण्यास सांगितले. त्यावेळी मिलिंद जोशी याने तक्रारदार यांच्याकडे दोन हजार रुपयांची लाच (Demanding Bribe) मागितली. तडजोडीमध्ये दीड हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau Thane) गुरुवारी (दि.23) तक्रार केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
तक्रारदार यांनी केलेल्या लाचेची पडताळणी केली असता मिलिंद जोशी याने तपास अधिकाऱ्याकडून से घेऊन तो कोर्टात जमा करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. ठाणे एसीबीने (Thane ACB) आज (सोमवार) दुपारी सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना जोशीला रंगेहाथ पकडले
Web Title :- Anti Corruption Bureau Thane | Police personnel caught in anti-corruption bureau trap while accepting bribe of Rs 1500
Gold Silver Price Today | महिन्याच्या अखेर सोन्या-चांदीचे दर ‘जैसे थे’; जाणून घ्या आजचा भाव
Crime News | भर पोलीस चौकीत महिलेवर बलात्काराचा प्रयत्न; पोलीस कॉन्स्टेबल निलंबित