Anti Corruption Bureau Thane | लाच घेण्यासाठी ‘तो’ कार्यालयात रात्री साडेआठ वाजेपर्यंत थांबला; जात पडताळणी समितीचा सचिव ACB च्या जाळयात

anti corruption bureau thane district caste certificate scrutiny committee thane bribe acb thane

ठाणे :बहुजननामा ऑनलाइन  –  Anti Corruption Bureau Thane | जात प्रमाणपत्र अवैध असून वैध प्रमाणपत्रासाठी लाच घेणार्‍या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या सचिवाला (district caste certificate scrutiny committee) लाच लुचपत प्रतिबंधक (Anti Corruption Bureau Thane) विभागाने ५० हजार रुपयांची लाच मागून १० हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले. किशोर पंडितराव बडगुजर Kishor Panditrao Badgujar (वय ४८, संशोधन अधिकारी, रा. जिओ मॅट्रिक्स, कामोठे, नवी मुंबई, पनवेल) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

याबाबतची माहिती अशी, तक्रारदार यांचे मुलाचे जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी ऑनलाइृन अर्ज केला होता. परंतु आरोपीने  तक्रारदार यांना तुझ्या मुलाचा जात प्रमाणपत्र अवैध असून वैध प्रमाणपत्रासाठी ५० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. याबाबत तक्रार यांनी पालघर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पडताळणीत त्याने तडजोडीअंती १० हजार रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने नवी मुंबईतील कार्यालयात सापळा रचला. रात्री साडेआठ वाजता तक्रारदाराकडून १० हजार रुपये स्वीकारताना किशोर बडगुजर याला पकडण्यात आले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप,
पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास, हवालदार नितीन पागधरे, पोलीस अंमलदार संजय सुतार, दीपक सुमडा, नवनाथ भगत, विलास भोये, निशिगंधा मांजरेकर, स्वाती तारवी, सखाराम दोडे यांनी ही कारवाई केली.

 

web title : anti corruption bureau thane district caste certificate scrutiny committee thane bribe acb thane.

 

Ovarian Cancer | ‘या’ गोष्टी वाढवू शकतात कॅन्सरचा धोका, अंडे आणि कॉफी आवडणार्‍यांनी सुद्धा व्हावे सावध; जाणून घ्या

Drinking Water And Health | जाणून घ्या आरोग्यासाठी केव्हा, का आणि किती पाणी पिणे आवश्यक

Mutual Funds Sip | 15x15x15 चा फार्म्युला वापरून करोडपती बनने सोपे, वयाच्या 50 व्या वर्षी होऊ शकता 10 कोटीचे मालक; जाणून घ्या

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 48 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी