पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे महानगरपालिकेच्या (pune municipal corporation) महिला अधिकाऱ्यास पुण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (anti corruption bureau pune) 50 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. विशेष म्हणजे 30 जून रोजी महिला अधिकारी सेवानिवृत्त होणार होत्या. पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (anti corruption bureau pune) केलेल्या धडक कारवाईमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
मंजुषा इधाटे Manjusha Idhate असे पकडण्यात आलेल्या महिला अधिकाऱ्यांचे नाव आहे.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस Shivajinagar Police ठाण्यात गुन्हा Crime दाखल करण्याचे काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंजुषा या महापालिकेत टेक्निकल ऍडव्हायझर म्हणून नोकरीस आहेत.
दरम्यान, यातील तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक Builders आहेत.
त्यांची पालिकेत टीडीआर प्रकरणं सुरू आहेत.
ते प्रकरण महिला अधिकारी Women Officers यांच्याकडे होते.
त्यावेळी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपयांची लाच मागितली होती.
याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज सापळा कारवाईत त्यांना 50 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे.
या कारवाईने पालिकेत प्रचंड खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे महिला अधिकारी 30 जून रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे सर्वत्र हळहळ देखील व्यक्त होत आहे.
कृपया हे देखील वाचा:
विप्रोचे चीफ एक्झीक्यूटिव्ह आहेत देशातील सर्वात महागडे अधिकारी, इतकी आहे त्यांची सॅलरी
Pune News | पुणे विभागात म्हाडाच्या घराला प्रचंड प्रतिसाद; 3 हजार घरांसाठी 57 हजार आले अर्ज
काय सांगता ! होय, 74 % भारतीय कर्मचार्यांना आवडला ’वर्क फ्रॉम होम’ पर्याय