चाकण पोलीस ठाण्यातील ‘त्या’ अधिकाऱ्याच्या संमतीनंतर खासगी व्यक्तीने लाच घेतल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, एका खासगी इसमाला 85 ते 90 हजार रुपयांची लाच घेताना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस उप अधीक्षक श्रीहरी पाटील (DySP Shrihari Patil) यांनी पोलीसनामा ऑनलाईनशी बोलताना दिली. या व्यक्तीने एका पोलीस अधिकाऱ्यासाठी लाच घेतल्याची चर्चा आहे. मात्र, ज्या पोलीस अधिकाऱ्यासाठी लाच घेतली. तो अधिकारी सध्या तपासासाठी बीड येथे गेल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीकडे कसून चौकशी केली जात आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Pune) केलेल्या कारवाईमुळे पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode), अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav), अप्पर अधीक्षक सुहास नादगौडा (Addl SP Suhas Nadgaud) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली.
Web Title :- Anti Corruption Bureau Pune | Acb pune arrested one private person while taking bribe of 85000 in absence of psi chakan police station pimpri chinchwad police commissionerate
Crime News | तब्बल 70 गाढवांची चोरी; मालकाच्या तक्रारीनंतर पोलिसांची गल्लीबोळात शोधमोहिम
Pune Crime | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक
Pune Crime | पुण्यात 29 वर्षीय महिलेचा विनयभंग ! डेक्कन पोलिस ठाण्यात वकिलावर गुन्हा दाखल