मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Anti Corruption Bureau Mumbai | दाखल गुन्ह्यात अटक करुन लागलीच पोलीस ठाण्यात जामीन देण्यासाठी २० हजार रुपयांची मागणी करुन १० हजार रुपये स्वीकारणार्या पोलीस उपनिरीक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Mumbai) सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे.
विकास नामदेव लोखंडे Vikas Namdev Lokhande (वय ३३) असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. लोखंडे (PSI Vikas Lokhande) हा अंधेरी पूर्व येथील एम आय डी सी पोलीस ठाण्यात नेमणूकीला आहेत.
तक्रारदार यांच्याविरुद्ध एम आय डी सी अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटक करुन लागलीच पोलीस ठाण्यातच जामीन देण्यासाठी व कोर्टात न पाठविण्यासाठी विकास लोखंडे याने प्रथम २० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. याबाबत फिर्यादी यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे ८ डिसेंबर रोजी तक्रार केली होती.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या तक्रारीनुसार पडताळणी केली असताना विकास लोखंडे याने तक्रारदार याच्याकडे
तडजोडीअंती १० हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार एम आय डी सी पोलीस ठाण्यात तक्रारदाराकडून
१० हजार रुपयांची लाच (Anti Corruption Bureau Mumbai) स्वीकारताना
लोखंडे याला पकडण्यात आले. एम आय डी सी अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title :- Anti Corruption Bureau Mumbai | ACB arrested police sub inspector vikas lokhande while taking bribe of 10 thousands in mumbai.