सातारा : बहुजननामा ऑनलाइन– बियर शॉपीचा परवान्याचे (Beer Shop Licenses) प्रकरण वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच मागणाऱ्या (Demanding Bribe) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) तीन अधिकाऱ्यांवर सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Satara) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Satara) सातारा शहर पोलीस ठाण्यात (Satara City Police Station) गुन्हा दाखल केल्यानंतर तिघांना अटक (Arrest) केली आहे. निरीक्षक सतीश विठ्ठलराव काळभोर Inspector Satish Vitthalrao Kalbhor (वय-56), दुय्यम निरीक्षक दत्तात्रय विठोबा माकर Deputy Inspector Dattatraya Vithoba Makar (वय-56), जवान नितीन नामदेव इंदलकर Jawan Nitin Namdev Indalkar (वय-36) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत 47 वर्षाच्या व्यक्तीने सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau (ACB) Satara) तक्रार केली आहे. तक्रारदार यांना नवीन बियर शॉपी सुरु करायची होती. यासाठी ते सातारा उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी त्यांच्याकडे दत्तात्रय माकर आणि नितीन इंदलकर याने परवान्याचा प्रस्ताव (Proposal) वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यासाठी तीन लाखाची लाच मागितली. तर निरीक्षक सतीश काळभोर यांनी तक्रारदाराला लाच रक्कम मागणीस प्रोत्साहन दिले. हा सर्व प्रकार 14 मार्च 2022 रोजी घडला होता.
दरम्यान सातारा एसीबीच्या (Satara ACB) अधिकाऱ्यांनी अनेक वेळा या अधिकाऱ्यांना पकडण्यासाठी सापळा रचला.
मात्र आरोपींना संशय आल्याने त्यांनी ठरलेली लाचेची रक्कम स्वीकारली नाही.
परंतु त्यांनी लाचेची मागणी केल्याचे एसीबीच्या तपासात निष्पन्न झाले.
त्यामुळे उत्पादन शुल्कच्या दोन अधिकारी आणि एका जवानावर गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना तातडीने अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के (Deputy Superintendent of Police Ashok Shirke) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Satara | bribery department arrests three excise officials for demanding rs 3 lakh for beer shop licenses in satara
हे देखील वाचा :
MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंना नवी उपाधी; ‘हिंदू जननायक’ म्हणून औरंबादमध्ये झळकले बॅनर !