पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – Anti Corrupation Pune | जिल्हा परिषदत अंतर्गत असलेल्या एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्पामध्ये कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असणार्या महिलेस 3 हजार 450 रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (Anti Corrupation Pune) रंगेहाथ पकडले आहे. महिला लिपिकास अटक करण्यात आली आहे. महिलेला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सीमा विद्याधर विपट (47, कनिष्ठ लिपिक, एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प (जिल्हा परिषद अंतर्गत), ता. मुळशी पौड, जि. पुणे) असे लाच घेणार्या महिलेचे नाव आहे. त्याच्याबाबत एका 26 वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर आज सापळा रचण्यात आला. पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे (SP ACB Rajesh Bansode), अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP ACB Suraj Gurav), अप्पर पोलिस अधीक्षक सुहास नाडगौडा (Addl SP Suhas Nadgouda) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक श्रीहरी पाटील (Dysp Shreehari Patil) आणि त्यांच्या सहकार्यांनी ही कारवाई केली आहे. पौड पोलिस ठाण्यात (Paud Police Station) गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. गुन्हयाचा पुढील तपास एसीबीचे अधिकारी करत आहेत.
Web Title : Anti Corrupation Pune | Pune female clerk caught taking Rs 3450 in anti-corruption scam
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Gold Price Today | सोन्याच्या किंमतीमध्ये 446 रूपयांची वाढ, चांदीही वधारली; जाणून घ्या आजचे दर