नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्नाटकमधील बीदर मधील शाहीन ग्रुपच्या शाळेला सीएए विरोधात मुलांचे नाटक बसवणे महागात पडले असून या नाटकामुळे शाळा आणि शाहीन एज्युकेशन इन्स्टिट्यूट विरुद्ध देशद्रोहाचा आरोप करण्यात आला आहे. सीएए संबंधित एका चौथीच्या मुलीचे नाटक बसवण्यात आले होते. या नाटकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान करण्यात आला होता.
रविवारी हे नाटक सादर करण्यात आले असून यात चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी नाटकामध्ये CAA आणि NRC लागू झाल्यास मुस्लिमांना देशातून बाहेर काढण्यात येईल असे दाखवले होते. याशिवाय नाटकातील एक पात्र मोदींविरोधात असभ्य भाषेत बोलताना दाखवण्यात आले असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे.
या नाटकात मोदींचा अपमान केला गेला असून हा कार्यक्रम पहिल्यांनंतर प्रेक्षकांनी मुलांचे टाळ्या वाजवून प्रोत्साहन वाढवल्याचे चित्र दिसले. एका प्रेक्षकाने हे नाटक फेसबुकवर लाइव्ह दाखवले होते. नंतर निलेश रक्शल्य नावाच्या व्यक्तीने पोलिसात तक्रार दाखल केल्यावर त्या शिक्षण संस्थेविरोधात कारवाई केली असून भारतीय दंड संहितानुसार कलम ५०४, ५०५ (२), १२४ ए, १५३ ए आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Visit : bahujannama.com