पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कोंढव्यातील (Kondhwa) एका 70 वर्षाच्या नराधमाने घरात आई वडिल नसल्याने पाहून घरात घुसून एका 10 वर्षाच्या मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
ही घटना कोंढवा-सासवड रोडवर परिसरात सोमवारी सकाळी 9 ते साडेदहा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी सांगितले की एका ३७ वर्षाच्या महिलेने कोंढवा (Kondhwa) पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी एका ७० वर्षाच्या वृद्धावर गुन्हा दाखल केला आहे.
ही महिला व तिचे पती घरी नसताना हा नराधम त्यांच्या घरात आला.
त्याने त्यांच्या 10 वर्षाच्या मुलीवर लैगिंक अत्याचार केला.
यापूर्वीही फिर्यादी व तिचे पती घरी नसल्याचा फायदा घेऊन मुलीला धमकावून तिच्यावर अत्याचार करीत होता.
दरम्यान सोमवारी सकाळी त्याने असाच प्रकार करीत असताना फिर्यादी त्यांच्या घरी आल्या.
तेव्हा त्याला घरात पाहून त्यांनी मुलीला काय झाले म्हणून विचारल्यावर ती रडायला लागली व तिने आपल्याला हा 10 रुपये देऊन असा प्रकार करत असल्याचे सांगितले.
त्यानंतर या महिलेने पोलिसांकडे धाव घेतली.
याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
महिला पोलीस उपनिरीक्षक चैत्राली गपाट अधिक तपास करीत आहेत.
कृपया हे देखील वाचा:
PM मोदी अन् मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या भेटीवर उदयनराजेंनी साधला निशाणा, म्हणाले…
दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 529 रूग्ण ‘कोरोना’मुक्त
Mercedes-Maybach GLS 600 भारतात झाली लाँच, अवघ्या 4.9 सेकंदमध्ये पकडते 100 kmph चा वेग
फी साठी विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करा – युवक क्रांती दल