बहुजननामा ऑनलाईन – Ankita Lokhande | बॉलिवूडमध्ये चांगलीच लगीसराई चालू आहे. नुकतेच विकी कौशल आणि कटरीना कैफ लग्नबंधनात (Vicky-Katrina Marriage) अडकले. अंकिता लोखंडे सुद्धा आता लग्नबंधनात अडकणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आधी सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh) सोबत रिलेशनमध्ये होती. मात्र दोघांच्या ब्रेक्रअप नंतर मागील तीन वर्षापासून अंकिता तिचा बॉयफ्रेंड विक्की जैनसोबत रिलेशनमध्ये आहे.
अंकिता आणि विकी लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर चांगल्याच रंगल्या आहेत. अंकिता (Ankita Lokhande) आणि विक्की (Vicky Jain) 14 डिसेंबरला लग्न करणार आहे. तर अंकिताचं हे लग्न जवळपास तीन दिवस चालणार आहे. 12 तारखेला मेहंदीचा सोहळा असणार आहे. तसेच 12 तारखेच्या रात्री त्या दोघांचा साखरपुडा देखील केला जाणार आहे. दोघांच्या हळदीचा समारंभ 13 तारखेला होणार असून, त्यासाठी त्यांनी काही खास थीम ठेवली आहे. तसेच या दोघांचे लग्न ग्रँड हयातमध्ये (Grand Hyatt) होणार आहे.
दरम्यान, 14 तारखेला अंकिता आणि विक्की लग्नबंधनात अडकणार असून, लग्न दोघेजण मराठमोळ्या पद्धतीने करणार आहेत. लग्नाची थीम पारंपारिक ठेवली असून, लग्न झाल्यानंतर रात्री रिसेप्शन पार्टी सुद्धा आयोजित केले आहे. तसेच काही दिवस आधीच अंकिता संगीत सेरोमनी प्रॅक्टिस करत असताना तिला दुखापत झाली. तिचा पाय फ्रॅक्चर झाला. मात्र नुकतंच अंकिता रिकव्हर होत आहे. तिने याबद्दलच एक व्हिडीओसुद्धा तिच्या सोशल मीडियावरील इंस्टाग्रामचा अकाउंटवर शेअर केला. त्यामध्ये ती एका व्हिल चेअरवर बसलेली दिसून येत आहे. तसेच तिला बघून अनेक चाहत्यांनी लग्नाआधी ती लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थनांचा वर्षाव केला आहे.
Web Title :- Ankita Lokhande | ankita lokhande vicky jain wedding haldi to reception complete timeline
Ileana D’Cruz | इलियाननं शेअर केले बोल्ड फोटो, कॅप्शनमध्ये हेटर्ससाठी लिहिला खास संदेश…
Tejaswini Pandit | तेजस्विनी पंडितचा बोल्ड अवतार… ‘अनुराधा’ या वेबसिरिजचं पोस्टर झालं तुफान व्हायरल…
Kareena Kapoor Khan | लोकांच्या गर्दीत करीना कपूर ठरली Oops Moment ची शिकार, ब्लाउजने दिला ‘धोका’
Prashant Kishor | ‘पंतप्रधान मोदी सर्वांचे ऐकतात हीच त्यांची खरी ताकद’ – रणनीतीकार प्रशांत किशोर