मुंबई :बहुजननामा ऑनलाइन – Anil Parab | एसटी महामंडळाला राज्य सरकारी सेवेत समावेश करण्याच्या मागणीवरुन एसटी कामगारांचा अनेक दिवसांपासून राज्यव्यापी संप (ST Workers Strike) सुरु आहे. जोवर यावर तोडगा निघत नाही तोवर आम्ही संप मागे न घेण्यावर कामगार ठाम आहेत. या पार्श्वभुमीवर काल राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यात बैठक झाली. मात्र ठोस निर्णय न झाल्याने संप आणखी चिघळला आहे. त्यातच आज अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानावर काळी शाई फेकण्यात आलीय. यावरुन चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आज (मंगळवारी) एसटी कामगारांच्या (ST Workers Strike) मुद्द्यावरून जनशक्ती संघटनेच्या 4 ते 5 कार्यकर्त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab)
यांच्या शासकीय निवासस्थानावर काळी शाई फेकली आहे. त्याचबरोबर त्यांच्या निवासस्थानी गोंधळ देखील घातला आहे.
असा गोंधळ घालणा-या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
#WATCH | Mumbai: Black oil paint thrown on the official residence of Maharashtra Transport Minister Anil Parab, by 4-5 Janshakti Sangathan workers protesting over the State Transport strike issue, who are now detained. pic.twitter.com/gF99ZZBC4q
— ANI (@ANI) November 23, 2021
नेमकं प्रकरण काय?
विलनीकरणावरुन मागील अनेक दिवसांपासून एसटी कामगारांचा संप सुरुय. यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली आहे.
मात्र, सरकार MSRTC च्या विलनीकरणासाठी तयार नाही. विलनीकरणाचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमण्यात आलीय.
तरीही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. अनेक कर्मचाऱ्यांचे निलंबन कऱण्यात आले.
तसेच काहींची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. दरम्यान, शरद पवारांसोबत बैठक झाली यावेळी तरी संपावर तोडगा निघण्याची आशा होती.
तसेच न्यायालयाचा निर्णय आल्याशिवाय आम्ही काहीही करणार नाही, अशी भूमिका अनिल परब (Anil Parab) यांनी स्पष्ट केली आहे.
Web Title : Anil Parab | st workers strike black paint thrown on transport minister anil parab official residence in mumbai MSRTC Video.
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 100 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी
Organ Repair Superfoods | शरीराचे खराब झालेले अवयव ठीक करतात ‘हे’ 5 सुपरफूड, DNA साठी सुद्धा चांगले