मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना सीबीआय प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे. सीबीआय तपास करत असलेल्या भ्रष्टाचार आणि वसुली प्रकरणात अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना जामीन मंजूर (Bail Granted) झाला आहे. देशमुख यांच्यावर जसलोक रुग्णालयात (Jaslok Hospital) उपचार सुरु आहेत. एम.एस. कर्णिक (Justice MS Karnik) यांच्या खंडपीठाने हा जामीन मंजूर केला आहे. 100 कोटी वसुली प्रकरणात देशमुख यांच्यावर खोटे आरोप केल्याचा युक्तीवाद देशमुख यांच्या वकिलांनी केला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
We argued on health grounds. His health was deteriorating & we produced his health records before the court… CBI said they will go to higher court against this order, court allowed them & in that context, stayed the order for 10 days: Adv Aniket Nikam, Anil Deshmukh's lawyer https://t.co/Xvt0xhGgJ0 pic.twitter.com/rYmUc28VgJ
— ANI (@ANI) December 12, 2022
उच्च न्यायालयाने अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणामध्ये कोणताही पुरावा नसताना आरोप केला आहे. या प्रकरणात 2021 मध्ये गुन्हा (FIR) दाखल झाल्यानंतर एप्रिल 2022 मध्ये बेकायदेशीरपणे त्यांना अटक (Arrest) करण्यात आली. परमबीर सिंग (Parambir Singh) आणि सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी देशमुख यांना अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा युक्तीवाद आम्ही न्यायालयासमोर केल्याची माहिती देशमुख यांचे वकील विक्रम चौधरी (Adv. Vikram Chaudhary) यांनी पत्रकारांना दिली.
Bombay High Court grants bail to former Maharashtra Home Minister Anil Deshmukh in corruption case. @AnilDeshmukhNCP #CBI pic.twitter.com/fh8xuBOfXG
— Bar & Bench (@barandbench) December 12, 2022
उच्च न्यायालयाने (High Court) जामीन मंजूर केल्यानंतर सीबीआयने (CBI) या जामिनाविरोधात
सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) जाणार असल्याचे न्यायालयाला सांगितले.
यासाठी 10 दिवसांची स्थगिती (Adjournment) या निर्णयावर द्यावी अशी मागणी सीबीआयने केली.
न्यायालयाने हे म्हणणे ऐकून घेत या निर्णयाला दहा दिवसांची स्थगिती दिली असल्याने देशमुख यांना
जामीन मंजूर झाला असला तरी त्यांना तुरुंगातून मुक्त केले जाणार नाही. अनिल देशमुख यांच्या वकिलांनी
याबाबत माहिती दिली. तसेच उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयातही कायम राहील असा विश्वास
त्यांनी व्यक्त केला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Anil Deshmukh | Former Home Minister Of Maharashtra And NCP Leader Anil Deshmukh Bail Stay For 10 Days CBI Will Appeal To SC
हे देखील वाचा :
Jitendra Awhad | ‘शाईफेक करणार्यावर 307 चा गुन्हा योग्य नाही’ – जितेंद्र आव्हाड