नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – Anil Deshmukh | १०० कोटी रुपयांच्या प्रकरणात मनी लाँड्रिंग (Money laundering) झाल्याच्या संशयावरुन आज सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) (ED) आज रविवारी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांच्या काटोलमधील घरी धाड टाकली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काही दिवसांपूर्वीच ईडीने अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. अनिल देशमुख यांचा नागपूरात (Nagpur) एक बंगला आहे. तेथे अगोदर सीबीआयने (CBI) छापा घातला होता. त्यानंतर ईडीनेही छापा घातला होता. त्यानंतर आता आज ईडीचे चार अधिकारी काटोल येथे दाखल झाले. त्यांनी अनिल देशमुख यांच्या काटोलमधील घरात तपासणी सुरु केली आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अगोदरच अनिल देशमुख यांच्या दोघा सहायकांना अटक केली होती. तसेच
अनिल देशमुख यांना समन्स पाठवून चौकशीला हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, अनिल देशमुख यांनी
चौकशीला हजर राहण्याऐवजी त्याला न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच देशमुख यांच्या पत्नी आरती
देशमुख (Aarati Deshmukh) यांनाही ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. त्यांनीही हजर राहण्याऐवजी
आपल्या वकिलांमार्फत आवश्यक असलेली कागदपत्रे ईडीचा सादर केली आहे.
Web Titel :- anil deshmukh enforcement directorate ed raids former maharashtra home minister anil deshmukhs residence in vad vihira near katol his native village in nagpur district
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update