नागपूरः बहुजननामा ऑनलाइन – Anil Deshmukh | 100 कोटींच्या वसुली प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या नागपुरातील घरावर ईडीने ( ED) छापेमारी(Raid) सुरु केली आहे. शुक्रवारी (दि. 25) सकाळी पावणेआठ पासून देशमुखांच्या घरी ईडीकडून 5 अधिका-यांमार्फत झडाझडती सुरू आहे. यावेळी अनिल देशमुख घरी नव्हते, तर त्यांची पत्नी आणि कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी देशमुखांच्या घराबाहेर बंदोबस्तासाठी सीआरपीएफचे जवान(CRPF personnel) तैनात केले होते. या कारवाईमुळे देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची सीबीआय (CBI) चौकशीचा ठराव कालच भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत झाला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी देशमुखांच्या घरावर ईडीने छापे टाकल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग(Param Bir Singh) यांनी अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दरमहा 100 कोटी हप्ता वसुलीचे टार्गेट दिले होते, असा सनसनाटी आरोप करून राज्यात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर या प्रकरणी मुंबई हायकोर्टा(bombay highcourt)च्या आदेशानुसार सीबीआयने (CBI) गुन्हा दाखल केला होता. या गुन्हाच्या अनुषंगाने ईसीआयर दाखल करत ईडीने तपास सुरु केला होता. ईडीने आज सकाळी देशमुखांच्या नागपुरातील घरी छापेमारी केली आहे. यापूर्वी सीबीआयने (CBI) देशमुखांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर महिनाभरातच ईडीनेही घरावर धाड टाकली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचीही सीबीआय चौकशी करावी, असा ठराव भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत मांडला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग (Param Bir Singh) यांच्या लेटर बॉम्ब संदर्भात पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.