बहुजननामा ऑनलाईन टीम : रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता चीनमधील तीन बँकांनी लंडनच्या कोर्टात ६८ करोड डॉलर म्हणजेच ४८. ५२ अब्ज न भरल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. २०१२ मध्ये, चीनच्या इंडस्ट्रियल एड कमर्शियल बँक (ICBC ) मुंबई शाखा, चाईना डेव्हलपमेंट बँक आणि एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ चायनाने अनिल अंबानी यांच्या फर्म रिलायन्स कम्युनिकेशनला (आरकॉम) खासगी गॅरंटीच्या अटीवर ९२.५२ कोटी डॉलरचे कर्ज दिले असल्याची माहिती आयसीबीसीचे वकील बंकिम थांकी यांनी न्यायालयात दिली. फेब्रुवारी २०१७ पासून अंबानी यांनी देय भरला नसल्याचे कोर्टाकडून सांगण्यात आले आहे.
या संदर्भात अंबानी म्हणतात की, कर्जाच्या संदर्भात त्यांनी कधीही आपल्या वैयक्तिक मालमत्तेची हमी दिलेली नाही. दरम्यान गेल्या वर्षांपासून अंबानी यांच्या अडचणीत वाढ होत आहे. देशातील श्रीमंत लोकांच्या श्रेणीत ते सतत मागे पडताना दिसत आहेत, तर दुसरीकडे त्यांचा मोठा भाऊ आशियातील सर्वात श्रीमंत आणि ५६अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील १४ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.
अनिल अंबानी यांच्या एकूण चार कंपन्यांवर ९३,९०० कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यापैकी ७००० कोटी रुपयांचे कर्ज रेड नेवल अँड इंजीनियरिंगवर आहे. तर आरकैप सर्वाधिक ३८, ९०० कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यानंतर रिलायन्स पॉवरवर ३०, २०० कोटींचे कर्ज आहे. याशिवाय रिलायन्स इन्फ्रावरही १७, ८०० कोटी रुपयांचे कर्ज आहे. गुरुवारी कोर्टाच्या सुनावणीच्या वेळी आयसीबीसीच्या वकिलांनी न्यायाधीश डेव्हिड वॅक्समन यांना सांगितले की, प्राथमिक आदेश किंवा सशर्त आदेशासाठी सुविधा करारानुसार संपूर्ण रक्कम आणि व्याज अंबानी यांना द्यावे लागेल. मात्र, अंबानी यांनी आपल्या मालमत्तेचा कोणताही पुरावा देण्यास नकार दिला आहे.
Visit : bahujannama.com