तमिळनाडु : वृत्तसंस्था – सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एका जाहिरातीने तामिळनाडुच्या कयालपत्तिनम गाव आणि परिसरात अस्वस्थता वाढवली आहे. ही जाहिरात 11 जानेवारीला एका स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती. ज्यामध्ये खातेधारकांना लवकरात लवकर केवायसी करण्यास सांगण्यात आले होते आणि यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये एनआरसी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर) ला सुद्धा समाविष्ठ करण्यात आले होते. ही जाहिरात पाहिल्यानंतर खास करून परिसरातील मुस्लिम बांधवांनी बँकेसमोर रांग लावली होती. परिसरात अशी अफवा पसरली होती की, या जाहिरातीचा संबंध सीएएशी आहे. या अफवेच्या परिणामामुळे बँकेच्या या शाखेतून जानेवारी 20 ते 22 दरम्यान कयालपत्तिनमच्या लोकांनी सुमारे 4 कोटी रूपये काढून घेतले.
अफवेमुळे लोकांमध्ये दहशत
कयालपत्तिनममध्ये राहणारे आणि वकील असणारे अहमद साहिब यांनी सांगितले की, आमचे सेंट्रल बँकेशी कोणतेही शत्रुत्व नाही, लोक फक्त एवढ्यासाठीच घाबरले की बँक केवायसीसाठी एनआरसी बंधनकारक करू शकते. यामुळेच लोक घाबरले आणि बहुतांश लोकांनी बँकेत जमा असलेले पैसे काढून घेतले. अहमद साहिब यांनी स्वत: देखील बँकेत जमा असलेले 3.50 लाख रूपये काढल्याचे सांगितले. ते म्हणाले, त्यांच्या ओळखीच्या सर्व लोकांनी असे केले आहे. स्थानिक लोकांनुसार सीएएबाबत अगोदरच अनेक शंकाकुशंका आहेत, अशातच बँकेने नोटिफिकेशन प्रसिद्ध केल्याने अनेक अफवा पसरल्या. मात्र, या प्रकारानंतर ताळ्यावर आलेल्या सेंट्रल बँकेच्या अधिकार्यांनी घरोघरी जाऊन लोकांना समजावण्यास सुरूवात केली.
बँक अधिकार्यांनी सांगितले एनआरसी जरूरी नाही
सेंट्रल बँकेच्या अधिकार्यांनी सांगितले, एनपीआर एक संवेदनशील प्रकरण आहे आणि त्यामुळे कयालपत्तिनमचे लोक अस्वस्थ आहेत. परंतु, आता स्थिती नियंत्रणात आहे. आम्ही या भागात पोस्टर्स लावून याबाबत माहिती दिली आहे आणि लोकांना न घाबरण्याचे आवाहन केले आहे. आम्ही हेदेखील स्पष्ट केले की, एनआरसी केवळ पर्याय आहे अनिवार्य नाही. आम्ही ही माहिती लोकांना लाऊडस्पीकरवरून दिली. याच परिसरातील कॅनरा बँकेच्या अधिकार्यांनी सांगितले की, एनआरसी अनिवार्य नाही. कॅनरा बँकेचे सीईओ शंकर नारायण यांनी सांगितले की, केवायसीसाठी एनआरसीची काहीही आवश्यकता नाही. बँकेला यासाठी केवळा आधार किंवा पॅन कार्डची आवश्यकता आहे. हे कागदपत्र बँक खाते असल्याबाबत आणि नवीन खाते उघडण्यासाठी पुरेसे आहेत. आरबीआयने याबाबत स्पष्ट नियम केले आहेत.
Visit : bahujannama.com