बहुजननामा ऑनलाइन टीम – दिल्लीत एका तरूणाने कुटुंबाशी झालेल्या वादानंतर आपल्याच छातीत चाकू खुपसून (young man stabbed)आत्महत्या केली. घटना बुधवारी रात्री पश्चिम विहारमध्ये झाली. पोलिसांनुसार, उदय मेहता, दिल्लीच्या सुंदर विहारमध्ये राहणारा असून, व्यवसायने इंजिनियर होता आणि कोरोना महामारीदरम्यान घरातून काम करत होता.
पोलीस उपायुक्त (आऊटर) ए. कोन यांनी म्हटले की, तपासादरम्यान समजले की, मृत व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबामध्ये काही कारणावरून वाद झाला होता, ज्यामुळे उदयने कुटुंबातील सदस्यांना धमकी दिली होती की, तो चाकू मारून घेईल. कुटुंबातील लोक त्याला समजावत होते, तेव्हा त्याने स्वत:वर हल्ला केला.
पोलिसांनी म्हटले की, कुटुंबातील लोक त्याची समजूत काढत असतानाच, अचानक तो जास्त आक्रमक झाला आणि आपल्या कुटुंबाच्या समोरच तो स्वत:च्या छातीवर वार करू लागला. कुटुंबियांनी त्याला जवळच्या हॉस्पीटलमध्ये दाखल केले, जिथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
डीसीपी ए. कोन यांनी म्हटले की, पुढील कारवाई सुरू करण्यात आली असून तपास सुरू आहे.