बहुजननामा ऑनलाईन – बाळाला खेळवताना त्याला वर फेकले पण झेलता न आल्यामुळे फरशीवर पडल्यामुळे बाळाचा मृत्यू झाला आहे. बालकल्याण संकुलात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. बाळाच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
अल्पवयीन मुलाच्या जबाबानंतर मृत्यूस जबाबदार असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सागर दाते यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलीस पुढील कारवाई करत आहे. आनंदाने बाळाला हवेत उडवत झेलण्याची लोकांनी भारी हौस असते. मात्रा, अशा बेफिकिरीमध्ये एखाद्याचा नाहक बळी गेल्याचे दिसून आले आहे. ज्याच्या हातातून बाळ पडले तोदेखील निराधार आहे. पण त्याला बाळाचा लळा लागला होता. त्यामुळे त्याला खेळवताना हा प्रकार घडला. ही घटना घडल्यापासून तो खूप अस्वस्थे होता. पण चौकशीदरम्यान, पोलिसांनी त्याला विश्वासात घेत समज दिली. त्यानंतर त्याने सर्व खरी हकीकत सांगितली. यानुसाक आता पोलीस पुढील कारवाई करत आहेत.