मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Amruta Fadnavis on CM Uddhav Thackeray | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या (Devendra Fadnavis) वजनावरून टीका केली होती. त्यानंतर फडणवीस यांनी काल (रविवारी) झालेल्या उत्तर सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
बाबरी पाडली त्यावेळी मी तिथे होतो, असं फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली. प्रत्येकजण अयोध्येला निघाला आहे. बाबरी मी पाडली म्हणतात. पण, देवेंद्रजी तुम्ही बाबरीवर पाय जरी ठेवला असता तर तुमच्या वजनाने बाबरी पडली असती, असा टोमणा उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना लगावला होता. यानंतर उत्तर सभेत फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. आता अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी देखील उडी घेतली आहे.
वज़नदार ने हल्के को,
बस हल्के से ही वज़न से,
कल ‘हल्का’ कर दिया … 🙃#Maharashtra— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) May 16, 2022
अमृता फडणवीस म्हणाल्या, ”वजनदार (त्यांच्या मते देवेंद्र फडणवीस) व्यक्तीने हलक्या (अमृता यांच्या मते उद्धव ठाकरे) व्यक्तीला अतिशय हलकं वजन वापरून हलके केले. तुम्ही आधीच हलक्या वजनाचे होते आणि त्यांनी तुमचं वजन आणखी कमी केलंय”, अशा आशयाच्या हिंदीतील ओळी ट्विट करत अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना टोला लगावला.
अमृता फडणवीस यांच्या ट्विटमधील ओळी..
वज़नदार ने हल्के को,
बस हल्के से ही वज़न से,
कल ‘हल्का’ कर दिया …
Web Title :- amruta fadnavis attack on cm uddhav thackeray criticism devendra fadnavis weight maharashtra political news
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हे देखील वाचा :