मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– Amruta Fadnavis | सोशल मीडियावरील आपल्या पोस्ट आणि राजकीय टिका – टिप्पणीमुळे नेहमीच चर्चेत असणार्या भाजपा नेते आणि नवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची गायन कला सुद्धा नेहमीच चर्चेत असते. आता त्यांनी कला क्षेत्रातील त्यांच्या भविष्यातील प्रोजेक्टबद्दल सांगितले आहे. एका वृत्तवाहिनीला त्यांनी ही माहिती दिली. (Amruta Fadnavis)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अमृता फडणवीस म्हणाल्या, पुढील काही महिन्यांतच माझी नवी गाणी चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. मी रेकॉर्ड केलेली आणि शूट केलेली 2 – 3 गाणी आताही तयार आहेत. खरे तर या महिन्यातच ती गाणी रिलीज होणार होती. पण काही कारणास्तव आता पुढच्या दोन – तीन महिन्यात 2 गाणी येतील. नंतर आणखी काही गाणी आहेत. (Amruta Fadnavis)
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतात.
त्यांचे क्षेत्र वेगळे असले तरी त्यांच्या राजकीय पोस्ट सुद्धा चर्चेत असतात.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात जोरदार स्वागत झाले होते.
नागपुरात असताना अमृता फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता.
त्यांनी म्हटले होते की, देवेंद्रजी, एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी वेशांतर करून जात होते.
अमृता यांच्या या वक्तव्यावरून सोशल मीडियावर त्यांनाही काहींनी ट्रोल देखील केले होते.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीस यांनी केलेल्या ट्विटची सुद्धा चर्चा झाली होती.
आपले (महाराष्ट्राचे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून अभिनंदन आणि वाटचालीसाठी शुभेच्छा’, असे ट्विट करत त्यांनी दोघांचे अभिनंदन केले होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Amruta Fadnavis | amruta fadnavis reveals future plans about singing career songs spiritual music read details
हे देखील वाचा :
Pune Crime | हातचलाखी करुन ATM कार्ड घेऊन केली फसवणूक; काही मिनिटात कार्ड बदलून काढले पैसे