मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Amruta Fadnavis | राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ड्रग्स प्रकरणात (Drugs case) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर आरोप केले आहेत. तसंच, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. नवाब मलिकांनी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांचा फोटो ट्विट केला होता. त्यावर आता अमृता फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
नवाब मलिक यांनी आज सकाळी अमृता फडणवीस यांचा फोटो ट्विट केला होता. शिवाय जयदीप राणा (Jaideep Rana) या ड्रग्स पेडरलनं (Drugs peddler) अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी गायलेल्या रिव्हर अँथमला अर्थसहाय्य केलं होतं. असा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. नवाब मलिकांच्या या आरोपांना प्रत्युत्तर देतना अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केले आहे.
Details of 'River Song' which shows Jaydeep Rana as Finance Head.
Song sung by Ms. Amruta Fadnavis
Video shows Devendra Fadnavis and Sudhir Mungatiwar as actorshttps://t.co/LddkleoTaQ pic.twitter.com/lWnq2d4wF6— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 1, 2021
अमृता फडणवीस यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, चोराच्या उलट्या बोंबा का असतात बुवा? कारण विनाशकाले विपरीत बुद्धी असते! असं प्रत्युत्तर अमृता फडणवीस यांनी अप्रत्यक्षरित्या मलिकांना दिले आहे.
चोराच्या उल्ट्या बोंबा का असतात बुवा ?
कारण *विनाशकाले विपरीत बुद्धी* असते !— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) November 1, 2021
नवाब मलिक काय म्हणाले ?
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांच्या पत्नीने अमृता यांनी एक गाणं गायलं होतं. नदी संरक्षण अभियानासाठी ‘रिव्हर साँग’ बनवलं होतं. त्यात सोनु निगम (Sonu Nigam) आणि अमृता यांनी गाणं गायलं होते. तर त्यात देवेंद्र फडणवीस यांनी अभिनय केला होता. या गाण्याला जयदीप राणा यांनी अर्थसहाय्य पुरवलं होतं. राणा हे ड्रग्स पेडलर आहेत. देवेंद्र फडणवीस व जयदीप राणा यांचे घनिष्ठ संबंध आहेत. गणपती दर्शनाच्या वेळी देवेंद्र फडणवीस व जयदीप राणा एकत्र आहेत. तसेच फोटोही आहेत. हे प्रकरण राज्यातील ड्रग्स व्यवसायासंबंधित आहे, असा गौप्यस्फोट नवाब मलिक यांनी केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Amruta Fadanvis | amruta fadanvis reaction on ncp minister nawab malik serious allegations on devendra fadnavis.
CM Uddhav Thackeray | CM उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला; म्हणाले – ‘फोडा काय बॉम्ब फोडायचे, पण…’
T20 World Cup | अजूनही टॉप 2 मध्ये राहू शकतो भारत, नॉकआऊटसाठी करू शकतो ‘क्वालिफाय’