बहुजननामा ऑनलाइन – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भाजप नेते एकनाथ खडसे यांना चिमटा काढत म्हटले की, तुम्ही खात्री बाळगा एकनाथ खडसेजी, तुमच्या जीवनातून खूप काही शिकल्यामुळे मी अशी चूक करणार नाही! सर्वांचे भले होवो!
देवेंद्र फडणवीस यांनी असा दावा केला होता की खडसे यांचा राजीनामा माझ्यामुळे नाही तर एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणामुळे घेण्यात आला होता. यावर उत्तर देताना खडसे म्हणाले होते की या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही. मला एमआयडीसीच्या जमिनीशी काहीही देणेघेणे नाही.
त्यांनी स्पष्ट केले होते की ही कथित जमीन माझी पत्नी आणि जावई यांनी घेतली होती. मी यावर व्यवहार केलेला नाही. मी महसूलमंत्री होतो, म्हणून पदाचा गैरवापर करण्याचा काय संबंध? मी मंत्री असताना माझे कुटुंबीय व्यवहार करू शकत नाही का? असा प्रश्न देखील खडसे यांनी उपस्थित केला होता.
तसेच खडसे म्हणाले होते की जर अमृता फडणवीस यांनी कुठला व्यवहार केला असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा गैरवापर केला असे म्हणता येईल का? खडसे यांनी दिलेल्या या उदाहरणानंतर अमृता फडणवीस म्हणाल्या की, ‘मी अशी चूक करणार नाही.’