• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Amravati News : 4 वर्षीय मुलाच्या अपहरण प्रकरणात धक्कादायक खुलासा, आजी निघाली सूत्रधार

by Jivanbhutekar
February 21, 2021
in क्राईम, राज्य
0
Amravati

अमरावती : बहुजननामा ऑनलाईन – अमरावती शहरामध्ये एका चार वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याची घटना बुधवारी (दि.17) घडली होती. ही घटना शहरातील शारदा नगरमध्ये घडली. नयन मुकेश लुनीया (वय-4) असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. नयन याचे रात्री आठच्या सुमारास अपहरण झाले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संवेदनशीलपणे हे प्रकरण हाताळून गुन्ह्याचा छडा लावला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गुन्ह्यात नयन याची आजीच अपहरणकर्ती निघाली. अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग यांनी दिली. सावत्र आजीने खंडणीसाठी आपल्या नातवाची सुपारी देऊन अपहरण करायला लावले, असा धक्कादायक खुलासा करण्यात आला.

नयन हा त्याची आजी मोनिका जसवतराय लुनीया (वय-47) हिच्यासोबत घराशेजारी खेळत असताना 17 फेब्रुवारी रोजी रात्री आठच्या सुमारास त्याचे अपहरण झाले. अपहरणाचा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली. संशयाची सुई आजीकडे गेली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास संवेदनशीलपणे करुन अहमदनगर येथून नयन या मुलाची सुटका केली.

याप्रकरणी पोलिसांनी आजीची मैत्रीण हिना शाकीर शेख उर्फ हिना अनिकेत देशपांडे, अल्मश ताहीर शेख (रा. कोठला अहमदनगर), मुजाहिद शेख (रा. मुकुंदनगर, अहमदनगर) या सर्वांना अहमदनगर शहरांतून वेगवेगळ्या भागातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच अपहरण केलेला नयन हा आसिफ शेख व फिरोज शेख यांच्या ताब्यात असल्याचे सांगितले. या माहितीवरून अमरावती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपींना आणि अपहरण झालेल्या मुलाला ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता, त्यांनी नयन याची आजी मोनिका जसवतराय लुनीया हिनेच शाकीर शेख हिला सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले. मोनिका लुनीया हिच्या माहेरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने आपल्या नातवाचे अपहरण करुन खंडणी वसूल करुन माहेरी पैसे देण्याचा प्लॅन केला होता. पोलिसांनी या प्रकरणात सहा जणांना अटक करुन बालकाची सुटका केली असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग यांनी दिली. नयन याचे अपहरण करण्याचा प्लॅन अधिच ठरला होता. यासाठी आरोपी सात दिवसांपासून अमरावती शहरात आले होते. पोलिसांनी अहमदनगर येथून पाच तर अमरावती येथून मोनिका लुनीया यांना अटक केली.

Tags: abduction caseAhmednagarAlmash Tahir Sheikhamravatiamravati newsHina Shakir SheikhKidnapping CaseMonica Jaswatrai LuniaNayan Mukesh LuniaPolice Commissioner Dr. Aarti SinghRansomअपहरण प्रकरणअमरावतीअल्मश ताहीर शेखअहमदनगरखंडणीनयन मुकेश लुनीयापोलीस आयुक्त डॉ. आरती सिंगमोनिका जसवतराय लुनीयाहिना शाकीर शेख
Previous Post

थेऊर : भरधाव वाहनाच्या धडकेत सुरक्षा रक्षक ठार

Next Post

Maharashtra : चिमुरचे भाजप आमदार, त्यांच्या वडिलांसह 5 जणांना राजस्थानमध्ये अटक (व्हिडीओ)

Next Post
mla kirtykumar

Maharashtra : चिमुरचे भाजप आमदार, त्यांच्या वडिलांसह 5 जणांना राजस्थानमध्ये अटक (व्हिडीओ)

Please login to join discussion
क्राईम

Pune News : लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय तरुणाचं केलं अपहरण, सोलापूर रस्त्यावर खून ?

March 2, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय कार चालकाचा खून करण्याच्या उद्देशाने अपहरण...

Read more

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 7863 नवे रुग्ण, 6332 जणांना डिस्चार्ज

March 2, 2021
Vitthal-Panbhare

वाशिम ! बहीणीच्या डोक्यावर अक्षता पडताच तरुणाचा सपासप वार करुन खून

March 2, 2021
hathras

हाथरस प्रकरण : मुख्य आरोपी गौरव ‘सपा’शी संबंधित, पीडिता म्हणते – ‘दहशतवादी आहे तो’

March 2, 2021
pooja-chavan-sanjay-rathod-dhananjay-munde

संजय राठोडांनंतर आता धनंजय मुंडेंना द्यावा लागणार राजीनामा ?

March 2, 2021
chitra-wagh-1

चित्रा वाघ यांनी मॉर्फ केलेल्या त्या फोटोविरोधात केली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

March 2, 2021
pune corona

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 688 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

March 2, 2021
platform-ticket

मध्य रेल्वेचा दणका ! प्लॅटफॉर्म तिकीट दरात केली 5 पटीने वाढ

March 2, 2021
team-india

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेला भारताचा ‘हा’ मुख्य खेळाडू मुकणार

March 2, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

Surya Grahan 2021 : यावर्षी कधी आणि केव्हा होईल सूर्यग्रहण, पहा संपूर्ण यादी

5 days ago

समलैंगिकासोबत राहणे कुटूंब नाही’, मोदी सरकारने कोर्टात ‘सेम सेक्स मॅरेज’ला केला विरोध

5 days ago

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 7863 नवे रुग्ण, 6332 जणांना डिस्चार्ज

5 hours ago

Pooja Chavan Death Case : … तर भाजपचे सगळे आमदार राजीनामा देणार, फडणवीसांचा सरकारला इशारा

2 days ago

जळगाव : भाजप आमदारास कोरोनाची बाधा, खासगी रुग्णालयात उपचार सुरु

3 days ago

Pune News : ‘कोरोना’च्या रॅपिड अँटीजन टेस्टचा अहवाल देण्यासाठी कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्याने घेतली लाच, प्रचंड खळबळ

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat