अमरावती : बहुजननामा ऑनलाइन – Amravati Love Jihad Case | कथित लव्ह जिहाद प्रकरणी खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) चांगल्याच तोंडघशी पडल्या आहेत. या प्रकरणात पोलीस ठाण्यात जाऊन गोंधळ घातल्याने नवनीत राणा चर्चेत आल्या होत्या. मात्र, सदर बेपत्ता तरूणी सापडल्यानंतर तिने पोलिसांना जबाब दिला असून आपण रागाच्या भरात घरातून निघून गेल्याचे म्हटले आहे. तसेच नवनीत राणा यांनी लव्ह जिहादचे वळण देऊन माझी बदनामी केली, असा गंभीर आरोप तरुणीने केल्याने प्रकरणाला धक्कादायक वळण लागले आहे. कथित लव्ह जिहादच्या तपासावरून पोलिसांवर आरोप करणार्या नवनीत राणा यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे. (Amravati Love Jihad Case)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पहाटे साडेतीन वाजता तरूणीला अमरावती पोलीस सातार्यावरून अमरावतीला घेऊन आले. पहाटे चार वाजता अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तरुणीचा जबाब नोंदवण्यात आला. तरुणीने जबाबात सांगितले की, की मी स्वतःहून रागाच्या भरात घरातून निघून गेले होते. खासदार नवनीत राणा यांनी माझी बदनामी केली आहे. जबाब घेतल्यानंतर या तरूणीला आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. खासदार नवनीत राणा आणि भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी याप्रकरणात लव्ह जिहादचा आरोप केला होता. परंतु तरूणीने दिलेल्या जबाबामुळे नवनीत राणा तोंडघशी पडल्या आहेत. (Amravati Love Jihad Case)
अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील रुग्णवाहिकेवर चालक असणार्या एका मुस्लीम व्यक्तीने सुशिक्षित हिंदू तरुणीशी लग्न केल्याचा प्रकार खासदार अनिल बोंडे यांनी उघडकीस आणला होता. मुस्लीम युवकाने तरुणीला विश्वासात घेत अमरावती येथील चंद्रविला या ट्रस्टकडून अवैधरित्या लग्न लावून घेतले, असे सांगण्यात आले.
चंद्रविला या विवाहसंस्थेला परवानगी नसताना संस्थेने बनावट लग्न प्रमाणपत्र दिल्याचा आरोप करण्यात आला होता.
नंतर या प्रकरणात नवनीत राणा यांनी उडी घेतली होती.
हिंदू तरुणींशी लग्न करून त्यांचे धर्मांतरण केले जाते आणि त्यांच्यावर शारीरिक तसेच मानसिक अत्याचार केला जात असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला होता.
या प्रकरणी राणा यांनी पोलिसांना सुद्धा धारेवर धरले होते.
त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Amravati Love Jihad Case | serious allegations of a girl on navneet rana in amravati love jihad case
हे देखील वाचा :
Weight Loss by Walking | चालता-चालता कमी करू शकता आपले वाढलेले वजन, केवळ ‘या’ सोप्या टिप्स फॉलो करा
Stroke Risk | ‘हा’ ब्लड ग्रुप असलेल्यांना स्ट्रोकचा धोका सर्वात जास्त, आतापासूनच व्हा सतर्क