मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Amol Mitkari | महापुरूषांवरील अक्षेपार्ह वक्तव्यामुळे अनेकदा टीकेचे धनी बनलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsinh Koshiyari) यांनी अखेर राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तशी इच्छा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे बोलून दाखविल्याचे एक निवेदन राज्यपालांच्या वतीने माध्यमांना पाठविण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १९ जानेवारी रोजी मुंबई दौऱ्यावर आले असता, याबाबतची इच्छा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त केल्याचे निवेदनात म्हटले आहे. यानंतर राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
‘महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा होती की, याआधीच राज्यपालांनी पदमूक्त व्हायला हवे होते. आता महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा, महापुरुषांचा अपमान करुन झाला आणि आता त्यानंतर उशीरा सुचलेले हे शहाणपण आहे. ‘अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केली आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले की, ‘ज्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत विकासकामांच्या उद्घाटनासाठी आले होते, त्यादिवशी राज्यपालांची देहबोली वेगळ्या पद्धतीची जाणवली होती. राज्यपालांनी कधीच महाराष्ट्र सोडून जायला हवे होते. पण यानिमित्ताने ते आता जात असतील तर महाराष्ट्र सुटकेचा निःश्वास सोडेल. दुसरं असं की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर जर सरकार कोसळले तर त्याअगोदरच आपण काढता पाय घ्यावा, अशी भावना त्यांच्या मनात जागृत झाली असेल. आज स्व. बाळासाहेब ठाकरे, नेताजी सुभाषचंद्र बोस, शहाजी राजे यांच्या जयंतीनिमित्त मी साकडे घालतो की, त्यांना लवकर सदबुद्धी मिळो आणि लवकर महाराष्ट्र सोडून त्यांनी राज्याला मोकळं करावं.’ असे यावेळी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले.
यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका केली आहे.
ते म्हणाले, ‘कायद्यानुसार राज्यपालांना पदउतार व्हायचे असेल, तर राष्ट्रपतींकडे अर्ज करायला हवा.
पण इथे तोंडी किंवा मौखिक स्वरूपात त्यांनी पंतप्रधानांकडे शिफारस केल्याचे माध्यमातील बातम्यांमध्ये दिसत आहे.
याचा अर्थ राष्ट्रपती भवनाचा कारभार नरेंद्र मोदी चालवतात का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लिहिलेल्या निवेदनात त्यांनी त्यांच्या इच्छेबद्दल भाष्य केले आहे.
नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन
जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त
केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या निवेदनात दिली.
तसेच, महाराष्ट्रासारख्या राज्याचा राज्यपाल होण्याचा बहुमान मला मिळाला. हे माझे अहोभाग्य होते.
गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता
येणार नाही. असेही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
Web Title :- Amol Mitkari | ncp leader amol mitkari says governor bhagat singh koshyari had should left maharashtra long before
हे देखील वाचा :
Rutuja Sawant | रुबीना दिलैक पेक्षाही बिकनी फोटोमध्ये ‘ही’ अभिनेत्री दिसते एकदम हॉट
Hansika Motwani | अभिनेत्री हंसिका मोटवानीने ॲब्ज दाखवत शेअर केले फोटोज