मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कौन बनेगा करोडपतीच्या सीजन ११ मधील स्पर्धक नुपूर चौहान गुरुवारी हॉटसीटवर पोहचली. नुपूर चौहानचे नाव हॉटवर येताच केबीसीचा पूर्ण स्टेज टाळ्यांनी कडकडायला लागला. स्वत: अमिताभ बच्चन नूपूरला घेण्यासाठी तिच्या सीटवर गेले. नुपूर चौहानला एक दुर्मिळ आजार आहे, त्यामुळे ती व्यवस्थित चालू नाही शकत. परंतु, नुपूर चौहानने ठरविले आहे की ती कधीही व्हील चेअरवर बसणार नाही, जर मग स्टँड घेऊन चालावे लागले तरी. नुपूर यांची हॉट सीट वर वर्णी लागताच अमिताभ बच्चन हे स्तब्ध झाले कारण नुपूर यांनी आपल्या आयुष्यातील काही थरारक अनुभव या मंचाच्या माध्यमातून सांगितले. अमिताभ यांनी फास्टस फिंगरचा निकाल जाहीर करताच नुपूर मोठं मोठ्याने रडू लागली हे पाहूनच अमिताभ बच्चन तिच्या शेजारी आले. नुपूर शांत झाल्यावर तिच्या भावाने येऊन तिला उचलले आणि हॉटसीट वर बसवले यामुळे संपूर्ण मंचाने यावेळी टाळ्यांचा कडकडाट केला.
या वेळी करोडपतीच्या प्रश्नाआधी अमिताभ यांनी नुपूर यांच्या अशा परिस्थितीचे कारण विचारले तेव्हा नुपूरने सांगितले की त्या Mixed Cerebral Palsy आजाराने ग्रासलेल्या आहेत. या आजरामध्ये व्यक्तीच्या शरीराचा एक भाग निकामी होतो किंवा ती व्यक्ती बागी माणसांच्या तुलनेने खूपं लहान राहते. नुपूरने सांगितले की सुदैवाने त्यांचे पाय काम करत नाहीत मात्र मेंदू पूर्णतः काम करतो. नुपूर ने सांगितले की तिचा ज्यावेळी जन्म झाला होता त्यावेळी ती रडत नाही हे पाहून डॉक्टरांना ती जिवंत नसल्याचे वाटले त्यामुळे डॉक्टरांनी तिला मृत समजून डस्टबिनमध्ये टाकले. मात्र नूपुरच्या आजी आणि मावशीने एका कर्मचाऱ्याला पैसे देऊन तिच्या पाठीवर मारायला सांगितले. तसे करताच नुपूर रडू लागली ऑक्सिजनची कमी असल्यामुळे त्यावेळी नुपूर रडू शकली नाही.नंतर मात्र १२ तास नुपूर रडली. त्यावेळी नुपूरला टिटनेस आणि ज्वाइंडिसचा आजार आहे समजून चुकीचे इंजेक्शन दिले गेले. नुपूरने सांगितले की डॉक्टरांच्या चुकीमुळे केस इतकी बिघडली की मी बाकी मुलांप्रमाणे नॉर्मल नाही राहू शकले.
यावर अमिताभ बच्चन यांनी डॉक्टरांच्या या कृत्याबद्दल हा एक अपराध असल्याचे म्हंटले तर नुपूर यांची ही परिस्थिती ऐकल्यावर मी तुम्हाला काय म्हणू मी एकदम स्तब्ध आहे असं बच्चन यावेळी म्हणाले.तर अमिताभ यांनी यावेळी नूपुरच्या धाडसाचे कौतुकही केले.नुपूर पुढील भागात २५ लाखांच्या प्रश्नासाठी खेळणार आहे. तर पुढील भागात सिंधुताई सपकाळ या सुद्धा उपस्थित असणार आहेत.