Amitabh Bachchan Accident | शुटिंग दरम्यान अमिताभ बच्चन यांचा अपघात, उपचारासाठी रुग्णालयात दाखल

 Amitabh Bachchan Accident | amitabh bachchan seriously injured during the shooting of project k injured ribs updates on his health

हैदराबाद : वृत्तसंस्था – बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan Accident) यांचा शूटिंगदरम्यान अपघात झाला असून यामध्ये ते जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हैदराबाद येथे प्रोजेक्ट K च्या (Project K) शूटिंगदरम्यान हा अपघात झाला असून त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या बरगड्यांना दुखापत झाल्याची माहिती आहे. (Amitabh Bachchan Accident)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

हैदराबादमध्ये प्रोजेक्ट K च्या शूटिंगदरम्यान (Shooting) एका अॅक्शन सिनचं चित्रीकरण सुरू होते. त्यावेळी त्यांना ही दुखापत झाली. त्यानंतर चित्रिकरण रद्द करावं लागलं आहे. बच्चन यांच्या बरगड्यांना दुखापत झाली असून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan Accident) यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

 

 

अपघातानंतर अमिताभ बच्चन यांचे हैदराबादमधील एआयजी रुग्णालयामध्ये (AIG Hospital Hyderabad)
सिटी स्कॅन (Ct Scan) करण्यात आले. चेकअपनंतर त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
दुखापतीमुळे त्यांना वेदना होत असल्याने डॉक्टरांनी त्यांना काही औषधे आणि पेनकिलर्स दिले आहेत.
या दुखापतीतून सावरुन पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी अमिताभ बच्चन यांना काही काळ लागणार आहे.
अमिताभ बच्चन हे जखमी झाल्याचे वृत्त आल्यापासून त्यांच्या चाहत्यावर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे. (Amitabh Bachchan Injured)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Amitabh Bachchan Accident | amitabh bachchan seriously injured during the shooting of project k injured ribs updates on his health

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीच्या नाकाचे हाड केले फ्रॅक्चर; कोंढव्यातील घटना

V V Karmarkar Passes Away | मराठी क्रीडा पत्रकारितेचे जनक वि. वि. करमरकर यांचे निधन

Pune Crime News | विषारी औषध दिल्याने 3 कुत्र्यांचा मृत्यु; एकाविरोधात गुन्हा दाखल