मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कोरोना विषाणूविरुद्ध लढताना हजारो आरोग्यसेवक आपला जीव धोक्यात घालत आहेत. त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. या आरोग्यसेवकांचा पगार न कापता त्यांच्या कार्यासाठी त्यांना अधिक पगार द्यावा अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आहेत. अमित यांनी आपले काका आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव यांना पत्र लिहून आपली विनंती केली आहे. आरोग्यसेवकांचा पगार कमी केल्याची माहिती मिळाल्यानंतर अमित ठाकरे यांनी पुढाकार घेऊन त्यांची बाजू पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांसमोर मांडली आहे.
आरोग्यसेवक जीवची जोखीम पत्करून नागरिकांची सेवा करत आहेत. त्यामुळेच सगळ्या लढाईला बळ मिळत आहे. आशातच त्यांच्या घरातील व्यवहार नीट चालतील याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांच्या पगारातील पैसे काढून घेण्यासाठी त्यांच्या कामासाठी त्यांना अधिक पैसे द्यावते असे मला वाटते असे अमित यांनी या पत्रात म्हटले आहे.