पुणे :बहुजननामा ऑनलाइन – Amit Raj Thackeray | महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्यानं नैराश्यात आलेल्या पुण्यातील स्वप्नील लोणकर (Swapnil Lonkar) या तरुणाने नुकतीच आत्महत्या केली. स्वप्नीलच्या आत्महत्येचे राजकीय पडसाद उमटत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित राजसाहेब ठाकरे (Amit Raj Thackeray) हे स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांची दौंड तालुक्यातील केडगाव येथे जाऊन भेट घेऊन कुटुंबीयांचं सांत्वन केलं. यावेळी अमित राजसाहेब ठाकरे (Amit Raj Thackeray) यांनी एक धानादेश स्वप्नीलच्या वडिलांकडे सुपूर्द केला. आगामी काळात MPSC च्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला तर तो फक्त स्वप्नीलच्या त्यागामुळेच असेल असं अमित ठाकरे यावेळी म्हणाले.
मनसे प्रलंबित प्रश्नाबाबत पाठपुरावा करेल
मनसे नेते अमित ठाकरे यांनी स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांची केडगाव येथे जाऊन भेट घेऊन सांत्वन केलं. यावेळी मनसे नेते बाबू वागसकर यांच्यासह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या नियुक्तया व प्रलंबित प्रश्नाबाबत मनसे पाठपुरावा करेल, प्रसंगी आंदोलन उभारेल असे बाबू वागसकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी दोन लाखांचा धनादेश अमित ठाकरे याच्या हस्ते स्वप्नील लोणकरच्या वडिलांकडे सुपूर्द करण्यात आला.
नैराश्येतून स्वप्नीलची आत्महत्या
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (MPSC Exam) उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी (JOB) मिळाला नसल्याने तणावातुन व आर्थिक परिस्थितीमुळे स्वप्नील सुनील लोणकर Swapnil Lonakar (वय-24 रा. गंगानगर, फुरसुंगी) या विद्यार्थ्याने (Student) गळफास घेऊन आत्महत्या(suicide) केली. ही घटना पुणे शहरातील फुरसुंगी येथील गंगानगर मध्ये 29 जून रोजी घडली. स्वप्नील याने स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली होती.
MPSC मायाजाल आहे, यात पडू नका
आत्महत्या करण्यापूर्वी स्वप्नीलने सुसाईट नोट लिहिली आहे. याध्ये त्याने MPSC मायाजाल आहे,
यात पडू नका. येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत फक्त वय आणि ओझ वाढत जातं. आत्मविश्वास
तळाला पोहोचतो आणि स्वत: बद्दल शंका वाढत जाते. 2 वर्षे झाली आहेत उत्तीर्ण होऊन आणि 24
वय संपत आलंय. घरची एकंदरीत परिस्थिती, परीक्षा निघणार या आशेवर घतलेलं कर्ज, खासगी नोकरी करुन कधी ही न फिटू शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी मी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना. कोरोना नसता, सर्व
परीक्षा सुरळीत झाल्या असत्या तर आज आयुष्य खूप वेगळं आणि चांगलं असतं. हवं ते ठरवलं ते
प्रत्येक साध्य झालं असतं. मी घाबरलो, खचलो असं मुळीच नाहीये, फक्त मी कमी पडलो.
माझ्याकडे वेळ नव्हता, असं सुसाईड नोटमध्ये लिहलं आहे.
याप्रसंगी मनसे नेते राजेंद्र (बाबू) वागसकर उपाध्यक्ष सुधीर पाटसकर, सरचिटणीस किशोर शिंदे,
नवी मुबंई शहर अध्यक्ष गजानन काळे, कामगार नेते नरेंद्र तांबोळी, विध्यार्थी सेना शहर अध्यक्ष
कल्पेश यादव, बारामती-दौड-इंदापूर तालुका अध्यक्ष उपस्थीत होते.
web title: Amit Raj Thackeray | If MPSC students get justice in future, it will only be because of Swapnil’s sacrifice – Amit Thackeray
Baramati Police News | बारामती पोलिस उपमुख्यालयासाठी 300 पदे भरण्यास मंजूरी