बहुजननामा ऑनलाइन : अमेरिकेची अंतरिक्ष संस्था (NASA)ने चंद्राची ‘एक्स-रे ऑब्जर्वेटरी’ सुरू केल्यापासून NASA अवकाशातील एकापेक्षा एक अद्भुत चित्र पाठवत आहेत. नोबेल पारितोषिक विजेते भारतीय-अमेरिकन वैज्ञानिक सुब्रमण्यम चंद्रशेखर यांच्या नावाने ओळखले जाणारे, ह्या दुर्बिणीला एक्स-रे सारख्या अवकाशातील उच्च-उर्जाच्या प्रकाश किरणांचा अभ्यास करण्यासाठी २३ जुलै १९९९ रोजी सुरू करण्यात आले. गेल्या दोन दशकात या दुर्बिणीने बर्याच लाईट इमेज पाठवल्या आहेत, परंतु कॅसिओपिया ए अर्थात कॅस एची प्रतिमा सर्वात सुंदर म्हणून ओळखली केली जात आहे. हे चित्र नासाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे.
चंद्र एक्स-रे ऑब्जर्वेटरी ही नासाच्या चार महान ऑब्जर्वेटरी तिसरी आहे. चंद्राचा एक्स-रे उच्च रेझोल्यूशन मिररमुळे मागील कोणत्याही एक्स-रे दुर्बिणीपेक्षा १०० पट अधिक संवेदनशील असतो. या प्रकरणात, पृथ्वीवर आधारित दुर्बिणीद्वारे ती किरणे शोधले जाऊ शकत नाहीत. कारण या एक्स-रे शोधण्यासाठी अंतराळ-आधारित दुर्बिणींची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत चंद्र यांना अवकाशात पाठविण्यात आले. हे अभियान २०१९ पर्यंत सुरू राहील.
कॅसिओपिया ए पृथ्वीपासून सुमारे ११ हजार प्रकाश वर्षे दूर आहे. असंख्य तार्यांच्या तेजामुळे, तो चमकणारा तारा ढिगाऱ्या सारखा दिसत आहे. खगोलशास्त्राच्या मते, जेव्हा तार्यांमध्ये प्रज्वलन आवश्यक असलेले इंधन संपत असते, तेव्हा ते आपसात घर्षण करतात. घर्षणातून उर्वरित ताऱ्यांचे द्रव्यमान १. ४ पट पेक्षा कमी असल्यास, तो श्वेत बाटुतारा बनतो, ज्याचा आकार पृथ्वीच्या समतुल्य आहे. दरम्यान , हा फोटो पोस्ट केल्यानंतर नासा ने लिहिले आहे कि, ‘२० वर्षांपूर्वी चंद्राने कॅसिओपिया ए हे पहिले चित्र काढले होते. त्यानंतर दोन दशकांनी हे छायाचित्र काढले आहे.’
https://www.instagram.com/nasachandraxray/