नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 फेब्रुवारी रोजी दोन दिवसांच्या भारत दौर्यावर आले होते. ट्रम्प यांनी भारतात येण्याची ही पहिलीच वेळ होती. गुजरातमधील अहमदाबाद आणि आग्रा येथे त्यांचे स्वागत करण्यासाठी खुप सुंदर सजवले गेले होते. यावेळी, डोनाल्ड ट्रम्प यांनी अहमदाबादमधील जगातील सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या मोटेरा स्टेडियममध्ये 1 लाखाहून अधिक लोकांना संबोधित केले. त्यांच्या भाषणादरम्यान अमेरिकन राष्ट्रपती हिंदीमध्येही बोलताना दिसले आणि बर्याच भारतीयांची नावे अगदी अनोख्या पद्धतीने उच्चारली. डोनाल्ड ट्रम्प हिंदीमध्ये लोकप्रिय भारतीय लोकांचे नाव घेताना दिसले. पण जेव्हा त्यांनी स्वामी विवेकानंद यांचे नाव हिंदीमध्ये घोषित केले तेव्हा सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडविण्यात आली.
अमेरिकन कॉमेडियन ट्रेवर नोआने आपल्या कॉमेडी शो ‘The Daily Show With Trevor Noah’मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या हिंदी उच्चारणाची खिल्ली उडविली. ट्रेवर नोआचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष स्वामी विवेकानंद यांच्या नावाऐवजी ‘विवेक का मुंडन’ बोलताना दिसत आहे. ट्रम्प यांच्या चेहर्यावरील भावदेखील खूप मजेदार आहेत. व्हिडिओमध्ये कॉमेडियन डोनाल्ड ट्रम्प यांचे हिंदी उच्चार ऐकून खूप हसतात.
या व्हिडिओमध्ये कॉमेडियन ट्रेवर नोआ असे म्हणत आहेत, ‘जरी त्यांचे उच्चारण बरोबर होते पण त्यांच्या चेहर्यावरील हावभाव पूर्णपणे चुकीचे होते. ट्रम्प यांचे भाषण संपल्यानंतर ट्विटरवर लोक वेडे झाले आणि त्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. ट्रम्प हिंदी शब्दांचा योग्यप्रकारे उच्चार करू शकत नाहीत, तसेच इंग्रजी शब्दांचा उच्चार योग्य प्रकारे करू शकत नाहीत. आपण.’ ट्रेवरच्या या मजेदार व्हिडिओवर त्याचे चाहते खूप प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.