नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनावरून चीनसोबत असलेल्या वादामुळे अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची धमकी याआधी दिली होती. मात्र आता अमेरिकेने औपचारिकता पूर्ण करून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. अमेरिकेचे खासदार बॉब मेनंडेझ यांनी ट्वीट करून माहिती दिली.
कोरोना साथीमुळे चीनसोबत असलेल्या वादामुळे अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून अधिकृतपणे बाहेर पडली आहे. अशी माहिती कार्यलयाकडून काँग्रेसला मिळाली आहे.” ट्रम्प यांनी मे महिन्यातच जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची धमकी दिली होती. चीनने कोरोनाबाबत जागतिक आरोग्य संघटनेची दिशाभूल केली आहे. चीनकडून कायम गोष्टी लपवल्या जात असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. चीनला कोरोनावर उत्तर द्यावंच लागेल असेही ट्रम्प म्हणाले होते.
Congress received notification that POTUS officially withdrew the U.S. from the @WHO in the midst of a pandemic.
To call Trump’s response to COVID chaotic & incoherent doesn't do it justice. This won't protect American lives or interests—it leaves Americans sick & America alone.
— Senator Bob Menendez (@SenatorMenendez) July 7, 2020
जागतिक आरोग्य संघटना चीनच्या नियंत्रणाखाली असल्याचा आरोपही यावेळी ट्रम्प यांनी केला. चीन जागतिक आरोग्य संघटनेला केवळ 40 मिलियन पैसे देते. तर अमेरिकेकडून 450 मिलियन डॉलरची मदत केली जाते. चीनकडून कमी पैसे मिळत असूनही जागतिक आरोग्य संघटनेवर त्यांचे नियंत्रण असल्याचा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.