नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचे वाढत्या संक्रमण लक्षात घेता इवांका ट्रम्पने शुक्रवारी घरातून काम करण्यास सुरुवात केली आहे. खरं तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी आणि वरिष्ठ सल्लागार इवांका ट्रम्पने अलीकडेच अमेरिकेला आलेल्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. कोरोना व्हायरसच्या चाचणीत पॉजिटीव्ह सापडल्या आहेत. तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले कि तेही कोरोनाची चाचणी करणार आहेत. त्यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले कि त्यांच्यात व्हायरसचे कोणतेही लक्षण दिसले नाही.
व्हाईट हाऊसच्या मेडिकल स्टाफने ट्रम्प यांना सल्ला दिला कि ते स्वतःला आयजोलेशनमध्ये ठेवण्याची गरज नाही. हाती आलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियाचे गृहमंत्री पीटर डटन शुक्रवारी सकाळी कोविड-१९ ची चाचणी पॉजिटीव्ह आली असून मागच्या आठवड्यात वॉशिंग्टनला गेलेल्या इवांका, ऍटर्नी जनरल विल्यम बार आणि इतर अधिकाऱ्यांकडून ५ मार्चला भेट दिली होती. डीरने सांगितले कि ‘व्हाईट हाऊसला माहित आहे कि डटन पॉजिटीव्ह सापडले आहेत. चर्चेदरम्यान त्यांच्यात आजाराचे कोणतेही लक्षण दिसले नव्हते.’
डटनने शुक्रवारी विधानात सकाळी जेव्हा ते उठले तेव्हा त्यांना ताप आणि त्यांचा घास खवखवत होता. आणि कोरोना व्हायरसच्या चाचणीत पॉजिटीव्ह सापडले आहेत. त्यांनी सांगितले कि सरकारच्या आरोग्य विभागाच्या सल्ल्यानुसार ते रुग्णालयात भरती झाले.