अमरावती : बहुजननामा ऑनलाईन – अमरावतीमध्ये कोरोनाने थैमान वाढत असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 53 वर पोहोचला आहे. आतापर्यत कोरोनाने 10 जणांचा बळी घेतला आहे. त्यासाठी नियोजन करणार्या वरुड येथील तहसीलदारांच्या वाहनचालकाच्या पत्नीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासकीय यंत्रणेने धसका घेतला आहे. वरूडचे तहसीलदार, इऊज,आरोग्य अधिकारी, 4 डॉक्टरांसह 16 कर्मचार्यांना क्वॉराटाईन केले आहे.
तहसीलदार यांच्या शासकीय वाहनावर वाहनचालकाच्या वडिलांचे 15 एप्रिल रोजी चांदूर रेल्वे येथे निधन झाले होते. त्यावेळी वाहनचालक पत्नीसह चांदूर रेल्वे येथे गेले होते. अंत्यविधीला यवतमाळ येथूनही काही जण आले असल्याची माहिती आहे. त्यातून वाहनचालकाच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तहसील कार्यालयाचे सॅनिटायजेशन करण्यात आले आहे. वरूड तालुक्याच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या असून वाहन चालकाच्या आसपासचा परिसर पूर्णतः कांटॉन्मेट झोन घोषित करण्यात आला आहे. वरूड तालुक्याची संपूर्ण यंत्रणा क्वाराटाईन झाल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे.
सर्वांना घरूनच काम करायला सांगण्यात आले आहे. कोरोनाच संक्रमण आत्तापर्यंत अमरावती शहरापुरताच मर्यादित होते. मात्र आता हळूहळू हे संक्रमण जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पसरायला सुरुवात झाली. दरम्यान जिल्ह्यातील तालुका ठिकाण असलेल्या वरुड येथील महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने वरुड परिसर बंद करण्यात आला आहे.
एनपी न्यूज24 नेटवर्क