पुणे : बहुजननामा ऑनलाइन– Aman Dangle Murder Case | अमन डांगळे खून प्रकरणात (Aman Dangle Murder Case) गोल्डमॅन दत्ता फुगे (Gold Man Datta Fuge) यांचा मुलगा शुभम फुगे (Shubham Fuge) याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने (Pune District Sessions Court) जामीन मंजूर केला आहे. हा जामीन 30 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मंजूर करण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अमन डांगळे खून प्रकरणात (Aman Dangle Murder Case) शुभम फुगे याला तीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. आरोपीच्या वतीने ॲड. सचिन झालटे -पाटील (Adv. Sachin Zalte-Patil), ॲड. पृथ्वीराज देशमुख (Adv. Prithviraj Deshmukh) व ॲड. शुभम कराळे (Adv. Shubham Karale) यांच्याकडून जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता.
सोन्याचा शर्ट (Gold Shirt) परिधान करत प्रसिद्ध झालेले पिंपरी-चिंचवडचे (Pimpri Chinchwad) गोल्ड मॅन दत्ता फुगे (Gold Man Datta Fuge) यांची 2016 साली हत्या (Murder) करण्यात आली होती. दरम्यान, भोसरी परिसरात 26 जुलै 2021 रोजी अमन सुरेश डांगळे याचा मृतदेह मिळाला होता. या हत्येचा तपास सुरू असताना भोसरी पोलिसांनी (Bhosari Police) शुभम फुगे व त्याच्या 2 साथीदारांना अटक केली होती. या प्रकरणात शुभम फुगे हा मुख्य आरोपी आहे. दत्ता फुगे यांच्या खून प्रकरणातील आरोपींच्या संपर्कात असल्याच्या संशयातून खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Aman Dangle Murder Case | Goldman Datta Fuge’s son granted bail
हे देखील वाचा :
Sayaji Hotels | सयाजीचा होतोय महाराष्ट्रभर विस्तार औरंगाबादमध्ये नवीन एनराईज हॉटेल सुरू