बहुजननामा ऑनलाइन टीम – समाजवादी पक्षाचे खासदार आजम खान यांना मोठा झटका बसला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने आजम खानचा मुलगा अब्दुल्ला आजम यांची आमदारकी रद्द केली आहे. निवडणुका लढताना अब्दुल्ला आझम वय पूर्ण नव्हते त्यामुळे त्यांनी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
बसपाचे उमेदवार असलेले नवाब काझिम अली यांनी अब्दुल्ला आजम यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. निवडणुकीच्या वेळी अब्दुल्ला 25 वर्षांचे नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. बनावट कागदपत्रे जोडून अब्दुल्ला यांच्यावर निवडणूक लढविल्याचा आरोप आहे. या तक्रारीवर सुनावणी झाल्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने 27 सप्टेंबर रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता, याच्यानंतर न्यायमूर्ती एसपी केसरवानी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
अब्दुल्ला आजम हे सपाचे खासदार आजम खान यांचा धाकटा मुलगा आहे. अब्दुल्ला यांनी 2017 च्या यूपी विधानसभा निवडणुकीत प्रथमच निवडणूक लढविली होती. रामपूर भागातील स्वार विधानसभा मतदारसंघातून अब्दुल्ला यांनी निवडणूक जिंकली होती.
2017 च्या विधानसभा निवडणुकीत, जिथे भाजपाने यूपीमध्ये आपले वर्चस्व गाजवले होते , तिथे आझम खान आणि त्याचा मुलगा अब्दुल्ला दोघेही रामपूरमधील जागा जिंकण्यात यशस्वी झाले. अब्दुल्ला आझम यांनी भाजपच्या उमेदवार लक्ष्मी सैनी यांचा 50 हजाराहून अधिक मतांनी पराभव केला तर बसपाचे नवाब काझिम अली तिसर्या क्रमांकावर होते.
यावर्षी जानेवारीत आकाश सक्सेना यांच्या तक्रारीवरून भाजपने आजम खानच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल केला. सक्सेनाने आपल्या तक्रारीत आझम खान यांचा मुलगा आमदार अब्दुला आजमवर दोन खोटे जन्म प्रमाणपत्रे बनविल्याचा आरोप केला होता. अब्दुल्ला आजम यांचे जन्म प्रमाणपत्र रामपूर नगरपरिषदेकडून 28 जून 2012 रोजी देण्यात आले होते असा आरोप होता. हे प्रमाणपत्र आजम खान आणि डॉ. ताजिन फातिमा यांच्या प्रतिज्ञापत्रांच्या आधारे देण्यात आले आहे, ज्यामध्ये रामपूरला अब्दुल्ला यांचे जन्मस्थान दर्शविले गेले आहे. दुसरे प्रमाणपत्र क्वीन मेरी हॉस्पिटलच्या डुप्लिकेट बर्थ सर्टिफिकेटच्या आधारे 21 जानेवारी 2015 रोजी लखनौ महानगरपालिकेकडून तयार केले गेले. यामध्ये लखनौला अब्दुल्ला यांचे जन्मस्थान दाखवले आहे.