All India Public Sectors Football Tournament | अखिल भारतीय पब्लिक सेक्टर फुटबॉल स्पर्धा; बँक ऑफ बरोडा, एअर इंडिया संघांचे एकतर्फी विजय

All India Public Sectors Football Tournament | One sided win for Bank of Baroda, Air India teams All India Public Sectors Football Tournament

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – All India Public Sectors Football Tournament | भारतीय खाद्य निगम (फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) आणि एडएसपीसी, पश्‍चिम यांच्या तर्फे आयोजित अखिल भारतीय पब्लिक सेक्टर फुटबॉल स्पर्धेत बँक ऑफ बरोडा आणि एअर इंडिया या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली. (All India Public Sectors Football Tournament)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

श्री शिवछत्रपती क्रिडा संकूल, बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत बँक ऑफ बरोडा संघाने एम्प्लॉई प्रोव्हिडन्ट फंड ऑर्गनायझेशन (इपीएफओ) संघाचा ६-० असा सहज पराभव करत केला. अरफात अन्सारी याने चार गोल करून सामन्यात मोलाचा वाटा उचलला. डेन्झिल मस्करेनास आणि जिल्ड जॉन यांनी प्रत्येकी एकेक गोल करून संघाची आघाडी वाढवली.

 

दुसर्‍या सामन्यात एअर इंडिया संघाने न्यावली लिग्नाइट कॉर्पोरेशन (एनएलसी) संघाचा २१-० असा धुव्वा उडविला. एअर इंडिया संघाकडून मृणाल तांदेल आणि डिऑन मेनेझेस यांनी प्रत्येकी ५ गोल मारले. सनी कोहली आणि आस्ताद मुन्शी यांनी प्रत्येकी ३ गोल मारले. नेस्टर मस्करेनास याने दोन गोल मारले. मार्टीन असिस आणि संतोष कोहली यांनी प्रत्येकी एक गोल करून संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला.

 

स्पर्धेचा निकालः गटसाखळी फेरीः

१) बँक ऑफ बरोडाः ६ (अरफात अन्सारी ७, ११, १५, ३८ मि., डेन्झिल मस्करेनास २५ मि., जिल्ड जॉन ५४ मि.)
वि.वि. एम्प्लॉई प्रोव्हिडन्ट फंड ऑर्गनायझेशन (इपीएफओ) : ०;

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

२) एअर इंडियाः २१ (नेस्टर मस्करेनास ५, २२ मि., मार्टीन असिस ९ मि., सनी कोहली २३, २९, ५६ मि.,
मृणाल तांदेल ३०, ३९, ५०, ७१, ७८ मि., डिवीट डाबरीओ ३२ मि., आस्ताद मुन्शी ३६, ७३, ७५ मि.,
डिऑन मेनेझेस ५३, ५९, ६०, ६४, ८० मि., संतोष कोहली ६९) वि.वि. न्यावली लिग्नाइट कॉर्पोरेशन (एनएलसी) : ०;

 

Web Title :- All India Public Sectors Football Tournament | One sided win for Bank of Baroda, Air India teams All India Public Sectors Football Tournament

 

हे देखील वाचा :

Pune News | दिव्यांग मुला-मुलींच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन; ३६ जिल्ह्यांमधून २२१५ दिव्यांग खेळाडू सहभागी होणार

IND vs AUS 1st Test | टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय; एक डाव अन 132 धावांनी मिळवला विजय

Jalna Crime News | मळणी यंत्रामध्ये महिलेची वेणी अडकल्यामुळे महिलेचा दुर्दैवी मृत्यू