All India Public Sectors Football Tournament | अखिल भारतीय पब्लिक सेक्टर फुटबॉल स्पर्धा; ऑईल इंडिया लिमिटेड, एम्प्लॉई स्टेट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया संघ यांच्या विजेतेपदासाठी लढत

All India Public Sectors Football Tournament | All India Public Sector Football Tournament; Oil India Limited, Employees State Corporation of India team fighting for the title

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – All India Public Sectors Football Tournament | भारतीय खाद्य निगम (फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) आणि एडएसपीसी, पश्‍चिम यांच्या तर्फे आयोजित अखिल भारतीय पब्लिक सेक्टर फुटबॉल स्पर्धेत ऑईल इंडिया लिमिटेड आणि एम्प्लॉई स्टेट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संघांनी प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. (All India Public Sectors Football Tournament)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

श्री शिवछत्रपती क्रिडा संकूल, बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऑईल इंडिया संघाने फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय) संघाचा सडन-डेथमध्ये ६-५ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. तुलीया दास याने ३८ व्या मिनिटाला गोल करून ऑईल इंडिया संघाचे खाते उघडले. पुर्वार्धात ही आघाडी कायम होती. उत्तरार्धात एफसीआय संघाच्या मोनु चौधरी याने ६२ व्या मिनिटाला गोल करून संघाला १-१ अशी बरोबरी निर्माण करून दिली. पूर्णवेळ ही बरोबरी कायम राहील्याने सामन्यामध्ये टायब्रेक पध्दतीचा अवलंब करण्यात आला. (All India Public Sectors Football Tournament)

 

टायब्रेकमध्ये ऑईल इंडियाकडून मिलन बासुमत्रे, तपु ब्रम्हीना, सुदेम वरी यांनी तर, एफसीआय संघाकडून मोनु चौधरी, मोनोरोस माझी, सुमन दत्ता यांनी गोल नोंदविले. ऑईल इंडियाच्या दिपज्योती डी., शिशुराम चुटीया यांना तर, एफसीआय संघाच्या जोए मेसी, सतिश हवालदार यांना गोल मारण्यात अपयश आले. त्यामुळे ४-४ अशी पुन्हा बरोबरी झाल्याने सडन-डेथ पध्दतीचा अवलंब करण्यात आला. यामध्ये एफसीआय संघाच्या विवेक सत्यम याने गोल केला तर, हेन्री स्टॅलिन याला गोल मारण्यात अपयश आले. ऑईल इंडियाच्या गेरेमशहा बासुमत्रे आणि मिनु बोरो यांनी गोल नोंदवित संघाला विजय मिळवून दिला.

 

विजया प्रभाकरन याने नोंदविलेल्या गोलांच्या जोरावर एम्प्लॉई स्टेट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया संघाने
एअर इंडिया संघाचा २-१ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. विजया प्रभाकरन याने पुर्वार्धात ३५ व्या मिनिटाला आणि जादाच्या वेळेमध्ये केलेल्या गोलाच्या जोरावर एम्प्लॉई स्टेट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया संघाने विजय मिळवला.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

स्पर्धेचा निकालः उपांत्य फेरीः
१) ऑईल इंडियाः ६ (तुलीया दास ३८ मि., मिलन बासुमत्रे, तपु ब्रम्हीना, सुदेम वरी, गेरेमशहा बासुमत्रे, मिनु बोरो);
(गोल चुकविलेः दिपज्योती डी., शिशुराम चुटीया) सडन-डेथमध्ये वि.वि. फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाः ५
(मोनु चौधरी ६२ मि., मोनु चौधरी, मोनोरोस माझी, सुमन दत्ता, विवेक सत्यम);
(गोल चुकविलेः जोए मेसी, सतिश हवालदार, हेन्री स्टॅलिन); फुल टाईमः १-१; टायब्रेकः ३-३; सडन-डेथः ६-५;

 

२) एम्प्लॉई स्टेट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाः २ (विजया प्रभाकरन ३५ मि., ९०+६ मि.) वि.वि. एअर इंडियाः १
(नेस्टर मस्करेनास (९०+७);

 

Web Title :- All India Public Sectors Football Tournament | All India Public Sector Football Tournament; Oil India Limited, Employees State Corporation of India team fighting for the title

 

हे देखील वाचा :

Indrani Balan Winter T-20 League | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; पुना क्लब, एसके डॉमिनेटर्स संघांची विजयी कामगिरी

IND Vs AUS Test Series | भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या ठिकाणात बदल; आता ‘या’ ठिकाणी होणार सामना

Mrinal Kulkarni | गोव्यातील सांस्कृतिक पुरस्कार सोहळ्यात मृणाल कुलकर्णी यांनी व्यक्त केली ‘हि’ खंत; म्हणाल्या….